Jammu Kashmir : मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, "कायदेशीररित्या कलम ३७०, ३५ए हटवलं नाही, वेळ येईल तेव्हा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 11:46 PM2021-09-17T23:46:44+5:302021-09-17T23:47:15+5:30
PDP च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ए हटवण्यावर भाष्य केलं आहे.
Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरच्या मादी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी राजौरी येथे पुन्हा एकदा जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० आणि ३५ए हटवण्यावर भाष्य केलं आहे. कलम ३७० आणि ३५ए हे कायदेशीररित्या हटवण्यात आलं नसून ते अवैधरित्या हटवण्यात आल्याचं मुफ्ती म्हणाल्या.
"कलम ३७० आणि ३५ए हे अवैधरित्या हटवण्यात आलं आहे. डाकू जी गोष्ट चोरून नेतात, ती त्याची नसते, त्याला परत आणायचं असतं. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही," असं मुफ्ती म्हणाल्या. "आपण निराश व्हायला नको. परंतु एक अशी वेळ येईल जेव्हा सरकार कलम ३७० आणि कलम ३५ए पुन्हा लागू करण्यासाठी भाग पाडलं जाईल आणि सराकरदेखील आपला निर्णय चुकीचा होता, जम्मू काश्मीरला अजून काय हवं आहे हे विचारेल असा विश्वास आहे," असं मुफ्ती म्हणाल्या.
We should not be disheartened. I believe that a time will come when not only Article 370 and Article 35A (will be reinstated) but the Government will be compelled to say that they did wrong and they will ask that what more do we want for J&K: PDP chief Mehbooba Mufti in Rajouri pic.twitter.com/QDknbCTVyY
— ANI (@ANI) September 17, 2021
५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० आणि ३५ए रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच जम्मू काश्मीरचं दोन भागांत म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश केले होते. यापूर्वी कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांना अनेक महिने नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.