कोरोनामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली, दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्यांना दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 04:11 PM2022-04-12T16:11:57+5:302022-04-12T16:14:14+5:30

Corona Cases: केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून तेथील कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

centre writes to delhi maharashtra and other three states on rising covid-19 cases | कोरोनामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली, दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्यांना दिल्या सूचना

कोरोनामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली, दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्यांना दिल्या सूचना

Next

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनामुळे चिंतेत असलेले केंद्र सरकार आता कृतीत उतरले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून तेथील कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशातील कोरोनाच्या दैनंदिन नवीन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा संदर्भ देत राजेश भूषण यांनी केरळ, दिल्ली, महाराष्ट्र, हरयाणा आणि मिझोरामच्या अधिकाऱ्यांना संसर्ग रोखण्यासाठी सतत देखरेख ठेवण्याचे आणि कोरोना व्यवस्थापनासाठी तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. याचबरोबर, कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरण आणि कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन या पाच-सुत्रीय धोरणांचा अवलंब करण्याची गरज आहे, असेही राजेश भूषण म्हणाले. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही आज कोरोनाच्या नवीन 'XE व्हेरिएंट ' संदर्भात बैठक घेतली. यावेळी कोरोनाच्या प्रकरणांचाही आढावा घेतला आणि कोरोनाचे नवीन  व्हेरिएंट्स आणि प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी सुरू असलेली देखरेख आणि पाळत ठेवणारी यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या सूचना मनसुख मांडविया यांनी दिल्या आहेत.

केंद्राकडून देखरेख वाढवण्याच्या सूचना
मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अधिकाऱ्यांना कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधे आणि औषधांच्या उपलब्धतेचा सतत आढावा घेण्यास सांगितले आहे. लसीकरण मोहीम पूर्ण गतीने राबवण्यावर आणि सर्व पात्र लोकांना लसीकरण करण्यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला आहे. दरम्यान, बैठकीत नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल, आरोग्य सचिव राजेश भूषण, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव, भारतातील लसीकरण पण राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे प्रमुख डॉ. एन.के. अरोरा आणि आरोग्य मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

Web Title: centre writes to delhi maharashtra and other three states on rising covid-19 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.