केंद्राच्या दोन लाख कोटींच्या कर्ज योजनेच्या हेतूला हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 03:41 AM2020-08-14T03:41:33+5:302020-08-14T06:43:22+5:30

फक्त ४६ टक्के खातेदारांनीच घेतले कर्ज

Centres Rs 2 lakh crore loan scheme not getting expected response | केंद्राच्या दोन लाख कोटींच्या कर्ज योजनेच्या हेतूला हरताळ

केंद्राच्या दोन लाख कोटींच्या कर्ज योजनेच्या हेतूला हरताळ

Next

- अतुल कुलकर्णी

मुंबई : केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात २ लाख कोटी रुपये उद्योगांना देण्यासाठी म्हणून फक्त साडेसहा टक्के व्याजाने देण्याची योजना जाहीर केली. त्यापैकी आजमितीला देशात फक्त ४६ टक्के खातेदारांनीच कर्ज उचलल्याची माहिती समोर आली आहे. अनेकांनी कमी व्याजदराचे हे कर्ज घेऊन स्वत:चे जास्त व्याजदराचे कर्ज फेडण्यासाठी याचा वापर केल्याचे आकडेवारी सांगते. परिणामी एवढे कर्ज देऊनही रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीत गेल्या चार महिन्यांत सगळ्या बँकांचे मिळून ७ लाख कोेटींनी कर्ज कमीच झाले आहे.

सरकारी, खासगी व बिगर बँकींग संस्थांनी हे कर्ज वाटप झाले आहे. महाराष्ट्राची आकडेवारी पाहिली तर आपल्याकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २,७४,२०४ खातेदारांना ७,५०४ कोटी २८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यापैकी १,५४,४३७ खातेदारांना ५,५१२ कोटी ९५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. लोकांनी स्वस्त दराने कर्ज मिळत असतानाही हे कर्ज घेण्याची तयारी दर्शवलेली नाही, असे सांगून एक बँक अधिकारी म्हणाले, केंद्र सरकारची योजना चांगली होती.

केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा काही उद्योगांना व खातेधारकांना झाल्याचे दिसते. डायरेक्ट कॅश रिलीफ या योजनेअंतर्गत अमेरिकेने ७५,००० डॉलर्सपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांना १,२०० डॉलर्स थेट खात्यात जमा करणे सुरु केले. चार जणांच्या एका कुटुंबात जास्तीत जास्त ३४०० डॉलर्स मिळू शकतील, अशी व्यवस्था केली. इंग्लंडमध्ये ‘जॉब रिटेन्शन स्कीम’अंतर्गत प्रत्येकाला महिन्याला सरासरी २५०० पौंड देण्याची तरतूद केली. जर्मनीने ‘शॉर्ट टाईम वर्क’ योजनेतून कामगारांचा ६०% पगार दिला. ही योजना युरोपियन महासंघाने लागू केली. आपण असा थेट पैसा द्यायला हवा होता. तो न दिल्याने आर्थिक चक्रात अडकलो आहोत.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

देशातील स्थिती
खातेधारक मंजूर कर्ज (कोटी) खातेधारक प्रत्यक्षात वाटप
३९,६६,७८८ १,३७,५८६.५४ २१,७८,२७७ ९२,०९०.२४ (कोटी)

महाराष्ट्रातील स्थिती
खातेधारक मंजूर कर्ज (कोटी) खातेधारक प्रत्यक्षात वाटप २,७४,२०४ ७,५०४.२८ १,५४,४३७ ५,५१२.९५ (कोटी)

सार्वजनिक क्षेत्रातील बँका
खातेधारक मंजूर कर्ज (कोटी) खातेधारक प्रत्यक्षात वाटप
३३,४२,१३४ ७२,८२०.२६ १९,०९,२९८ ५२,०१३.७६(कोटी)

कर्जवाटपात देशातल्या टॉपच्या २ बँका कोणत्या?
                                         खातेधारक        मंजूर कर्ज         खातेधारक         प्रत्यक्षात वाटप
स्टेट बँक ऑफ इंडिया       ५,४६,५०१    २१,१२१ (कोटी)     २,९९,३७५        १६,०४७ (कोटी)
कॅनरा बँक                         ४,६५,२३९    ८,२४४ (कोटी)      ३,५९,४९४        ६,२०० (कोटी)


कर्जवाटपात देशातल्या ‘बॉटम’च्या २ बँका कोणत्या?
                                      खातेधारक     मंजूर कर्ज        खातेधारक     प्रत्यक्षात वाटप
पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक     ३७,२७७      ८५९ (कोटी)       ३०,६५३        ७२६ (कोटी)
युको बँक                        १,४७,७८५   १,०९९ (कोटी)    ५६,५८६       ७९१ (कोटी)


साडेसहा टक्के व्याजाने मिळणारे
कर्ज घेऊन लोकांना आपल्या व्यवसायाचे पुनरुज्जीवन करता आले असते. कामगारांना काही प्रमाणात पगार देऊन परत कामावर आणता आले असते. मात्र हे दोेन्ही हेतू यातून साध्य झालेले दिसत नाही.

महाराष्टÑ स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष आणि बँक आॅफ महाराष्टÑचे माजी डायरेक्टर देविदास तुळाजापूरकर म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप होऊनही रिझर्व्ह बँकेच्या रेकॉर्डवर एकूण कर्जाची रक्कम वाढलेली दिसत नाही. उलट सगळ््या बँकांची कर्जाची रक्कम कमीच होताना दिसत आहे.

Web Title: Centres Rs 2 lakh crore loan scheme not getting expected response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.