भारतीय वंशाचे सुंदर पिचई गूगलचे सीईओ

By admin | Published: August 11, 2015 11:36 AM2015-08-11T11:36:55+5:302015-08-11T11:45:30+5:30

जगातील सर्वात लोकप्रिय इंजिन असलेल्या गूगल'च्या सीईओपदी भारतीय वंशाच्या सुंदर पिचई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

The CEO of Google's beautiful Pinchai Google CEO | भारतीय वंशाचे सुंदर पिचई गूगलचे सीईओ

भारतीय वंशाचे सुंदर पिचई गूगलचे सीईओ

Next
>ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. ११ - जगातील सर्वात लोकप्रिय इंजिन असलेल्या 'गूगल'च्या सीईओपदी भारतीय वंशाच्या सुंदर पिचई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गूगलचे संस्थापक  सर्जी ब्रिन व लॅरी पेज यांनी कंपनीत फेरबदल करत नवीन नियुक्त्या केल्या आहेत. तसेच एक मोठा बदल करत 'अल्फाबेट इंक' नावाची नवी कंपनीही स्थापन केली आहे. 
भारतात जन्म घेतलेले ४३ वर्षीय सुंदर पिचई हे मूळचे तामिळनाडूतील चेन्नई येथील रहिवासी आहेत. त्यांनी आयआयटी खरगपूरमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली व त्यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. टेक वर्ल्डमधील मोठे नाव असलेले पिचई, गेल्या ११ वर्षांपासून गूगलमध्ये कार्यरत आहेत. 
दरम्यान नव्याने स्थापन झालेल्या 'अल्फाबेट इंक' कंपनीच्या छत्राखाली गुगल व इतर उपकंपन्या येणार असून त्याचे सीईओपद लॅरी पेज यांच्याकडे असेल तर सर्जी ब्रिन अध्यक्षपद सांभाळतील.

Web Title: The CEO of Google's beautiful Pinchai Google CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.