देशांतर्गत विमान उड्डाणावर उपकर
By admin | Published: September 2, 2016 01:28 AM2016-09-02T01:28:06+5:302016-09-02T01:28:06+5:30
छोट्या शहरांना विमान सेवेने जोडण्यासाठी निधी उभा करता यावा यासाठी देशांतर्गत विमानाच्या उड्डाणांवर उपकर लावण्याच्या प्रस्तावास कायदा व न्याय मंत्रालयाने हिरवा
- कायदा खात्याची मंजुरी
नवी दिल्ली : छोट्या शहरांना विमान सेवेने जोडण्यासाठी निधी उभा करता यावा यासाठी देशांतर्गत विमानाच्या उड्डाणांवर उपकर लावण्याच्या प्रस्तावास कायदा व न्याय मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखविला आहे.
सूत्रांनी सांगितले की, विमानाच्या प्रत्येक उड्डाणामागे ७ हजार ते ८ हजार रुपयांचा उपकर लावण्याचा सरकारचा विचार आहे. प्रत्येक प्रवाशाला सुमारे ६0 रुपयांची अतिरिक्त किंमत त्यापोटी मोजावी लागेल. उड्डाणावर एकरकमी कर लावण्याऐवजी प्रत्येक तिकिटावर २ टक्के कर लावण्याचा एक प्रस्ताव सरकारसमोर आहे. या करातून सुमारे ५00 कोटी रुपये वर्षाला उभे राहतील. हा पैसा विभागीय पातळीवरील विमान प्रवासास सबसिडी देण्यासाठी वापला जाईल.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, असा कर लावला गेल्यास त्याला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता होती. न्यायालयात हा निर्णय टिकेल की नाही, याबाबत साशंकता होती. त्यामुळे कायदा मंत्रालयाचा सल्ला मागण्यात आला होता.