NitishKumar: थोडक्यात...! नितीशकुमारांवर औरंगाबादमध्ये खुर्ची फेकली; बिहारमध्ये समाधान यात्रेत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 08:33 PM2023-02-13T20:33:51+5:302023-02-13T20:34:40+5:30

 समाधान यात्रेला औरंगाबादला गेलेल्या नितीशकुमार यांच्यावर खुर्ची फेकण्यात आली.

Chair thrown at Nitishkumar in Aurangabad; security breach in Samadhan Yatra in Bihar | NitishKumar: थोडक्यात...! नितीशकुमारांवर औरंगाबादमध्ये खुर्ची फेकली; बिहारमध्ये समाधान यात्रेत खळबळ

NitishKumar: थोडक्यात...! नितीशकुमारांवर औरंगाबादमध्ये खुर्ची फेकली; बिहारमध्ये समाधान यात्रेत खळबळ

googlenewsNext

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गावागावात विकास कामे झाली की नाहीत, याची माहिती घेण्यासाठी समाधान यात्रा काढली आहे. यामुळे ते गावागावात जाऊन लोकांना भेटत आहेत. या यात्रेदरम्यान आज एक प्रकार घडला, यामुळे समाधान यात्रेत खळबळ उडाली होती.

 समाधान यात्रेला औरंगाबादला गेलेल्या नितीशकुमार यांच्यावर खुर्ची फेकण्यात आली. खुर्चीचा पाठीचा तुकड्या त्यांच्यावर अत्यंत जवळून भिरकवण्यात आला. कांचनपूर, बरुण येथे मुख्यमंत्र्यांसमोरून हा तुकडा गेला. ते बरुण ब्लॉकच्या कांचनपूर गावात गेले, तिथे त्यांच्यावर खुर्ची फेकण्यात आली.

कांचनपूर येथील पंचायत शासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते. उद्घाटनादरम्यान कोणीतरी खुर्ची फेकली. आढावा घेत असताना नितीशकुमारांच्या आजुबाजुला गर्दी झाली होती. लोकांच्या हातात अर्ज देखील होते. यातच एका व्यक्तीने त्यांच्या उजवीकडून खुर्ची फेकली. 

औरंगाबाद येथील खुर्चीच्या घटनेत नितीशकुमार यांना दुखापत झाली नाही. मात्र त्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधीही नितीशकुमार यांच्यावर हल्ला झाला आहे.
 

Web Title: Chair thrown at Nitishkumar in Aurangabad; security breach in Samadhan Yatra in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.