जगन मोहन रेड्डी यांच्यावर विमानतळात चाकूहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 03:54 AM2018-10-26T03:54:17+5:302018-10-26T03:54:37+5:30
वायएसआर काँग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी यांच्यावर गुरुवारी सकाळी विशाखापट्टणम विमानतळावर एका तरुणाने चाकूने हल्ला केला.
हैदराबाद : वायएसआर काँग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी यांच्यावर गुरुवारी सकाळी विशाखापट्टणम विमानतळावर एका तरुणाने चाकूने हल्ला केला. त्याला लगेच ताब्यात घेण्यात आले असून, सुदैवाने या हल्ल्यातून रेड्डी वाचले. त्यांच्या हाताला जखम झाली असून, त्यांना लगेच हैदराबादला नेण्यात आले.
रेड्डी हे गुरुवारी दुपारी हैदराबादला जाणाऱ्या विमानाची वाट पाहत लाऊंजमध्ये पक्षाच्या काही सहकाºयांसह बसले होते.
कॅ फेटेरियातील वेटरने कप त्यांच्यासमोर ठेवला. सेल्फी काढण्यासाठी तो रेड्डी यांच्या अधिक जवळ आला आणि त्याने खिशातून छोटासा चाकू काढून रेड्डींवर हल्ला केला. तिथे असलेल्या पक्षाच्या सहकाºयांनी व अन्य कर्मचाºयांनी त्या वेटरला ताबडतोब पकडले. तोपर्यंत चाकूचा वार खांद्याच्या खालच्या बाजूला, हातावर झाला होता आणि त्यातून रक्त वाहू लागले होते. त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आणि रक्तस्राव थांबल्यानंतर ते हैदराबादला आले. अटक केलेल्या वेटरचे नाव श्रीनिवास राव आहे. तो कॅफेटेरिया तेलगू देसमच्या एका नेत्याचा असल्याने या प्रकरणाला लगेच राजकीय रंग देण्यात आला. (वृत्तसंस्था)
>चौकशीचे आदेश
रेड्डी यांच्यावर हल्ला झाल्याचे ऐकून आपणास धक्का बसला, असे नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विमानतळ प्राधिकरण व सीआयएसएफच्या अधिकाºयांना दिले आहेत.