चाकणला कांद्याची आवक घटली
By admin | Published: May 26, 2015 02:03 AM2015-05-26T02:03:18+5:302015-05-26T02:03:18+5:30
भावातही किरकोळ घसरण : गुरांच्या बाजारात बैलांची संख्या वाढली
Next
भ वातही किरकोळ घसरण : गुरांच्या बाजारात बैलांची संख्या वाढलीचाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत घटून भावात किरकोळ घट झाली. या आठवड्यात बटाट्याची आवक स्थिर राहून भावात वाढ झाली. कांद्याची या आठवड्यात ४५० क्विंटल आवक होऊन कांद्याला या आठवड्यात प्रतवारीनुसार १ हजार ३०० ते १००० रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. बटाट्याची आवक ६०० क्विंटल होऊन १२०० ते ८०० रुपये असा प्रतिक्विंटलला प्रतवारीनुसार भाव मिळाला. भुईमूग शेंगांची व फळभाज्यांची आवक या आठवड्यात किंचित वाढली. राजगुरुनगरला या आठवड्यात पालेभाज्यांची आवक घटली. बाजार समितीच्या शेलपिंपळगाव आवारात पालेभाज्यांची आवक स्थिर राहिली. गुरांच्या बाजारात या आठवड्यातही शेळ्या-मेंढ्यांची संख्या वाढली. चाकण बाजाराची एकूण उलाढाल २ कोटी ४० लाख रुपये झाली.मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक ४५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १५० क्विंटलने घटली. तळेगाव बटाट्याची आवक ६०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून बटाट्याचा भाव मागील आठवड्याच्या १००० रुपयांवरून १२०० रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमूग शेंगांची आवक ७ क्विंटल झाली व भाव ५५०० रुपयांवर स्थिरावले. बंदूक भुईमूग शेंगांची आवक ५ क्विंटल होऊन ६५०० रुपयांचा कमाल भाव मिळाला. लसणाची या आठवड्यात काहीही आवक झाली नाही.खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरूनगर येथील आवारात या आठवड्यात ६५ हजार जुड्या मेथीची आवक झाली, तर ४५ हजार जुड्या कोथिंबिरीची आवक झाली व १५ हजार जुड्या शेपूची आवक झाली. बाजार समितीच्या शेलपिंपळगाव आवारात मेथी व कोथिंबिरीची अनुक्रमे ९०० व १५ हजार जुड्यांची आवक झाली. चाकणला हिरव्या मिरचीची एकूण आवक ३७५ क्विंटल झाली व मिरचीला १५० ते ५८० रुपये असा प्रतिदहा किलोसाठी भाव मिळाला.चौकट शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव : कांदा - एकूण आवक : ४५० क्विंटल. भाव क्रमांक १. १३०० रुपये, भाव क्रमांक २. १२०० रुपये, भाव क्रमांक ३. १००० रुपये.बटाटा - एकूण आवक ६०० क्विंटल. भाव क्रमांक १. १२०० रुपये, भाव क्रमांक २. १००० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रति १० किलोंसाठी मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : टोमॅटो ४५० पेट्या (६० ते १२०), कोबी २५० पोती (३० ते ४० रुपये.) फ्लॉवर ३५० पोती (४० ते ६५ रुपये.), वांगी २५० पोती (८० ते २०० रुपये.), भेंडी ४५० पोती (१५० ते २०० रुपये), दोडकी १०० पोती २०० ते २५० रुपये, काकडी ९० पोती (६० ते १०० रुपये), फरशी १३ पोती (९०० ते ९५० रुपये) ढोबळी २२० पोती (२५० ते ३०० रुपये), चवळी (काहीही आवक नाही), वाटणा ४० पोती (६५० ते ७०० रुपये). दुधीभोपळा १६० पोती (६० ते ७०रुपये), काकडी ४० पोती (१०० ते १२० रुपये), गवार १५० पोती (१५० ते २००), वालवड, चवळी व शेवग्याची काहीही आवक झाली नाही.पालेभाज्या : चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव : मेथी - एकूण ८ हजार ५०० जुड्या (७०० ते १५०० रुपये), कोथिंबीर-एकूण ६ हजार जुड्या (८०० ते १५०० रुपये), शेपू-एकूण १ हजार ५०० जुड्या (७०० ते ८०० रुपये), पालक - एकूण १ हजार जुड्या (४०० ते ४२० रुपये.)जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४५ जर्शी गायींपैकी ३५ गायींची विक्री झाली. (२०,००० ते ५०,००० रुपये), ७०० बैलांपैकी ४८० बैलांची विक्री झाली. (१५,००० ते ३५,०००), ३८ म्हशींपैकी २२ म्हशींची विक्री झाली. (२०,००० ते ६०,००० रुपये) शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ७ हजार ५४० शेळ्या मेंढ्यापैकी ६ हजार ६८० शेळ्या-मेंढ्यांची विक्री होऊन १ हजार ५०० ते १० हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात १ कोटी ७० लाख रुपयांची, तर एकूण बाजारात २ कोटी ४० लाख रुपयांची उलाढाल झाली.*चाकण बाजार विशेष*चाकणला कांद्याची आवक घटली*कांद्याचे भाव १३०० रुपयांवर*बटाट्याची आवक स्थिर*बैल व शेळ्यांच्या संखेत वाढ*एकूण उलाढाल २ कोटी ४० लाख