"पाकिस्तानकडून सुपारी घेतलीय..."; मौलाना शहाबुद्दीन यांच्या शमीसंदर्भातील विधानावरून चक्रपाणी महाराज भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 18:37 IST2025-03-06T18:35:55+5:302025-03-06T18:37:05+5:30
मोहम्मद शमीने सामन्यादरम्यान रोजा न धरून चूक केल्याचे मौलाना शहाबुद्दीन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर, अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची प्रतिक्रिया आली आहे.

"पाकिस्तानकडून सुपारी घेतलीय..."; मौलाना शहाबुद्दीन यांच्या शमीसंदर्भातील विधानावरून चक्रपाणी महाराज भडकले
भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने रोजा काळात मैदानावर एनर्जी ड्रिंक घेतल्याने बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन यांनी त्याच्या संदर्भात केलेल्या एका विधानाने वाद निर्माण झाला आहे. मोहम्मद शमीने सामन्यादरम्यान रोजा न धरून चूक केल्याचे मौलाना शहाबुद्दीन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर, अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची प्रतिक्रिया आली आहे.
स्वामी चक्रपाणी महाराज म्हणाले, "मौलाना यांच्या भारतीय क्रिकेटर शमी विरोधातील रोजा न धरण्यासंदर्भात करण्यात आलेल्या विधानावरून, असे जाणवते की, पाकिस्तानच्या इशाऱ्यावर, सुपारी घेऊन, भारतीय संघाला हरवण्यासाठी मानसिक त्रास देण्याच्या हेतूने, अशा प्रकारचे भाष्य केले जात आहे. अशा मौलानाला अटक करून चौकशी करायला हवी पाकिस्तानकडून किती रुपये घेऊन काम करत आहेत."
मला वाटते, तो देशासाठी खेळत असल्याचे पाहून अल्लाह देखील खुश होतील -
यासंदर्भात माधवी लता यांनीही संबंधित मौलानावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, "माझा मौलाना साहेबांना प्रश्न आहे की, ते (शमी) एक क्रिकेटर आहेत आणि मैदानावर भारताला विजय मिळवून देण्यासाठी स्वतःला तयार ठेवणे, ही त्यांची जबाबदारी आहे. जर देशाप्रति कुणी आपले कर्तव्य पार पाडत असेल, तर मौलानांचा त्यावर आक्षेप का? मला वाटते, तो देशासाठी खेळत असल्याचे पाहून अल्लाह देखील खुश होतील." एवढेच नाही, तर मौलानांवर निशाणा साधताना माधवी लता म्हणाल्या, की स्वतः क्रिकेट का बघत होते. कारण, रमजान सुरू असताना त्यांनी एंटरटेनमेंटपासून दूर रहायला हवे."
माधवी लता पुढे म्हणाल्या, "मी तर म्हणेन की, धर्म ही एक वैयक्तिक बाब आहे. जर मौलाना म्हणाले असते की, भारतासाठी खेळताना एका क्रिकेटरने एवढे काम केले आहे. तर आम्हाला आनंद वाटला असता."
काय म्हणाले होते मौलाना? -
बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन रिझवी शमी संदर्भात बोलताना म्हणाले, रोजा न धरून शमीने मोठा गुन्हा केला आहे. इस्लाममध्ये रोजा धरणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. यामुळे शरियतनुसार शमी गुन्हेगार ठरतो, अशा आशयाचे वक्तव्य करत संबंधित मौलाना यांनी शमीवर निशाणा साधला आहे. मोहम्मद शमीच्या ज्या फोटोवरून या वादाला सुरुवात झालीये तो फोटो भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल मॅच वेळचा आहे. या सामन्यात मोहम्मद शमीनं टीम इंडियाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.