चॅलेंज! कोरोनावर जगात कोणीही लस शोधुदे; भारताशिवाय उत्पादन अशक्यच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 07:42 PM2020-07-18T19:42:25+5:302020-07-18T19:44:04+5:30
CoronaVaccine: भारतातही कोरोना लसीवर संशोधन सुरु आहे. भारतीय कंपन्यांची दोन व्हॅक्सीन मानवी चाचणीच्या टप्प्यामध्ये आली आहेत. गरज आणि लोकसंख्येमुळे भारत दरवर्षी 3 अब्ज व्हॅक्सीन तयार करतो. यापैकी 2 अब्ज लसींची निर्यात केली जाते. हा उत्पादनाचा आकडा एवढा प्रचंड आहे की जगातील दर तीन व्हॅक्सिनमागे एक लस ही भारतीय आहे.
जगभरातील लोक कोरोनावर लस शोधण्याच्या मागे लागले आहेत. आधी शस्त्रास्त्र स्पर्धा होती. आता लस शोधण्याची स्पर्धा लागली आहे. एकीकडे कोरोनाचा जन्मदाता चीन कोरोना लस शोधल्याचे दावे करत आहे. तर अमेरिका, रशिया, ब्रिटनच नाही तर इवलासा मलेशियाही कोरोना लस शोधण्याच्या कामी लागला आहे. यामुळे कोण पहिली लस शोधतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या देशांचे स्वप्न भारताशिवाय प्रत्यक्षात येणार नाहीय.
वैद्यकीय तज्ज्ञांनुसार कोरोनाला जर हरवायचे असेल तर ही व्हॅक्सिन संपूर्ण जगासाठी आणि कमी किंमतीत उपलब्ध करावी लागणार आहे. आणि हे भारताशिवाय शक्य नाहीय. कारण भारतात जेवढ्या लस बनविल्या जातात तेवढ्या लस अख्ख्या जगात बनविल्या जात नाहीत. एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना लस तयार करायची ताकद फक्त भारताकडेच आहे.
भारतातही कोरोना लसीवर संशोधन सुरु आहे. भारतीय कंपन्यांची दोन व्हॅक्सीन मानवी चाचणीच्या टप्प्यामध्ये आली आहेत. गरज आणि लोकसंख्येमुळे भारत दरवर्षी 3 अब्ज व्हॅक्सीन तयार करतो. यापैकी 2 अब्ज लसींची निर्यात केली जाते. हा उत्पादनाचा आकडा एवढा प्रचंड आहे की जगातील दर तीन व्हॅक्सिनमागे एक लस ही भारतीय आहे.
कोरोनावर जगभरात 11 व्हॅक्सीन मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत. काही मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात आहेत. यात भारताच्या दोन आहेत. यामध्ये COVAXIN आणि ZyCov-D आहेत. भारत बायोटेक (Bharat Biotech) ची COVAXIN ची मानवी चाचणी सुरु झाली आहे. 375 रुग्णांवर याची चाचणी केली जात आहे. तर झायडस कॅडिला (Zydus Cadila) ZyCov-D चीही मानवी चाचणी सुरु आहे. या लसीची 1000 हून अधिक लोकांवर चाचणी सुरु आहे. तिसरी ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस असून तिची परदेशात चाचणी सुरु आहे. मात्र, पुण्यात उत्पादन सुरु झाले आहे.
याशिवाय भारताच्या सहा फार्मास्युटिकल कंपन्या ग्लोबल इंस्टिट्यूटसोबत मिळून वेगवेगळ्या स्तरावर कोरोना लसीच्या संशोधनासाठी काम करत आहेत. भविष्यात या कंपन्यांची कोरोना लसही लढाईमध्ये खूप महत्वाची भूमिका निभावणार आहेत.
काय आहे कारण?
भारतात लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. मास प्रॉडक्शनमुळे या लसी दुसऱ्या देशांच्या तुलनेत स्वस्तही असतात. पुण्याची सीरम इंस्टिट्यूट जगातील सर्वात जास्त लसी तयार करते. दरवर्षी ही कंपनी 1.5 अब्ज डोस तयार करते. यामुळे जगाला कोरोनाची व्हॅक्सिन मिळण्यासाठी भारताशिवाय पर्याय राहणार नाही. भले कोणत्याही कंपनीने, कोणत्याही देशाने कोरोनाची लस शोधली तरीही त्यांना ती लस मेड इन इंडियाच करावी लागणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या....
आयकराच्या फॉर्म 26AS मध्ये मोठे बदल; करदात्यांनो जाणून घ्या फायद्याचे की तोट्याचे
Video: "सुशांतचा आत्मा स्वर्गात, त्याच्यासोबत महिलाही"; जगप्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा
ब्रिटन गेमचेंजर ठरणार! मृत्यूच्या दाढेतील कोरोनाबाधितांना वाचविले; स्टेरॉईडची चाचणी यशस्वी
राजस्थान सत्तासंघर्षावर पहिल्यांदाच वसुंधराराजेंची प्रतिक्रिया; गेहलोतांना थेट मदतीचा झालेला आरोप
चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर
लॉकडाऊनमध्ये भविष्याची चिंता; लोकांची या सरकारी योजनेकडे 'उडी', तुम्हीही विचार करा...