गोमांसबंदीला दिल्लीच्या न्यायालयात आव्हान
By admin | Published: July 14, 2016 03:12 AM2016-07-14T03:12:33+5:302016-07-14T03:12:33+5:30
नवी दिल्ली : दिल्लीत गोमांसाचे सेवन करणे अथवा ते बाळगणे हा अपराध आहे. मात्र, या निर्णयालाच एका याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.
नवी दिल्ली : दिल्लीत गोमांसाचे सेवन करणे अथवा ते बाळगणे हा अपराध आहे. मात्र, या निर्णयालाच एका याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. गौरव जैन या विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिल्ली सरकारला नोटीस पाठविली आहे.
मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्या. संगीता धींगरा सहगल यांनी सरकारला १४ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. दिल्ली अॅग्रीकल्चर कॅटल प्रिजर्व्हेशन अॅक्टच्या त्या तरतुदी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यानुसार दिल्लीत गोमांस सेवन वा बाळगणे हा गुन्हा आहे. याचिकाकर्ता गौरव जैन याने निदर्शनास आणून दिले की, असेच प्रकरण मध्य प्रदेशातूनही आले आहे आणि उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकारकडून आलेल्या विधेयकाच्या अशाच तरतुदी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)