नेपाळमध्ये समन्वयाचे आव्हान
By admin | Published: April 30, 2015 02:15 AM2015-04-30T02:15:30+5:302015-04-30T02:15:30+5:30
आजवरच्या सर्वात भीषण अशा महाभूकंपाला सामोरे गेलेल्या नेपाळच्या नजरा आता संपूर्ण जगाकडे लागल्या आहेत.
भीषण परिस्थिती : अन्न, पाणी, ब्लँकेट्स, औषधांची मोठ्या प्रमाणात गरज
काठमांडू : आजवरच्या सर्वात भीषण अशा महाभूकंपाला सामोरे गेलेल्या नेपाळच्या नजरा आता संपूर्ण जगाकडे लागल्या आहेत. भारत मोठ्या भावाची भूमिका निभावत असताना आता ज्यांना गरज आहे, त्यांच्यापर्यंत योग्य ती मदत पोहोचवण्याचे मोठे आव्हान सध्या नेपाळला सतावत आहे.
आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास विविध क्षेत्रांत तज्ज्ञ असलेल्यांच्या टीम्स नेपाळमध्ये दाखल होत आहेत. या सगळ््या यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याच्या महाप्रचंड कामाचे आव्हान नेपाळसमोर आहे. अजूनही दूरवरच्या क्षेत्रांमध्ये बचावकार्य सुुरू झाले नसल्याने मृतांचा आकडा १० हजारांवर जाण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
नेपाळमध्ये अशी अनेक छोटी गावे आहेत, जिथपर्यंत मदत तर दूरच; पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचे मृतदेह काढणेही सुरू झालेले नाही. त्यात हवामानात होणाऱ्या बदलांमुळे साथीचे आजारांचा फैलाव होण्याचीही भीती आहे. काठमांडू पर्वतरांगांमध्येही मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पैकी गोरखा जिल्ह्यात देखील बचाव आणि मदतकार्य सुरू झालेले नाही.
भूकंपानंतर प्रथमच उघडली दुकाने
च्नेपाळचा ग्रामीण भाग सध्या वीज, पाणी, अन्न आणि औषधांसाठी अक्षरश: तडफडत आहे. तात्पुरते तंबू, वैद्यकीय मदतनीस आणि स्वयंसेवकांची या मदतकार्यासाठी आत्यंतिक गरज आहे. पेट्रोल आणि डिझेल टंचाईमुळे टॅक्सीचालकांकडून मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसत आहे.
च्काठमांडूमधील स्थिती आता अत्यंत धिम्या गतीने पूर्वपदावर
येत आहे. भूकंपानंतर आज पहिल्यांदा काठमांडूमधील दुकाने उघडली आहेत. जे तरुण व्यावसायिक आहेत, ते काही वेळ दुकानात घालवून शक्य तेवढा वेळ मदतकार्यासाठी देत आहेत.
हिमालय
कोपला!
अनेक कुटुंबे भीतीच्या सावटाखाली जगत असून, स्वत:च्या घरामध्ये जाण्यासही ती तयार नाहीत. यात सर्वाधिक बिकट स्थिती लहान मुले, स्त्रिया आणि वृद्ध यांची आहे.