सात अपक्षांचे आव्हान कायम गिरीश महाजनांनी फिरविले चक्र: देवकरांच्या माघारीने स्पर्धा संपली

By admin | Published: November 5, 2016 10:48 PM2016-11-05T22:48:40+5:302016-11-05T22:48:40+5:30

जळगाव : विधान परिषद निवडणुकीत केवळ भाजपा- शिवसेना नव्हे तर भाजपा-सेना-कॉँग्रेस- राष्ट्रवादी या चार पक्षांची युती असेच चित्र माघारीच्या शेवटच्या दिवशी समोर आले आहे. आणि या युतीची लढत होणार आहे ती सात अपक्षांशी. मात्र भाजपाने अर्धा गड जिंकल्याची आता परिस्थिती आहे.

The challenge for the seven independents continued. The competition ended with the defeat of Devshar | सात अपक्षांचे आव्हान कायम गिरीश महाजनांनी फिरविले चक्र: देवकरांच्या माघारीने स्पर्धा संपली

सात अपक्षांचे आव्हान कायम गिरीश महाजनांनी फिरविले चक्र: देवकरांच्या माघारीने स्पर्धा संपली

Next
गाव : विधान परिषद निवडणुकीत केवळ भाजपा- शिवसेना नव्हे तर भाजपा-सेना-कॉँग्रेस- राष्ट्रवादी या चार पक्षांची युती असेच चित्र माघारीच्या शेवटच्या दिवशी समोर आले आहे. आणि या युतीची लढत होणार आहे ती सात अपक्षांशी. मात्र भाजपाने अर्धा गड जिंकल्याची आता परिस्थिती आहे.
विधान परिषद निवडणूक लढविण्याचा निर्णय हा बहुतांश प्रमुख पक्षांनी घेतला होता. पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक लढविण्यासाठी व्यूहरचना तयार असल्याचे सांगण्यात येत होते. भाजपा विरुद्धची प्रत्येक निवडणूक लढवायचीच अशी भूमिका शिवसेनेने जाहीर केली होती. तीच भूमिका, कॉँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांचीही होती. उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यानंतर शिवसेनेकडून विविध निवडणुकांची जय्यत तयारी सुरू करण्यात आली. त्यात विधान परिषदेचाही समावेश होता. याबाबत पक्षाचे संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी पक्षाचे आमदार व जिल्हा प्रमुखांची बैठक घेऊन निवडणुकीसाठीची संभाव्य तीन नावे निि›त करून मातोश्रीवर त्याबाबत चर्चाही केली. यातूनच धरणगावेच नगराध्यक्ष सुरेश चौधरी यांचे नाव पुढे आले होते. मात्र सुरेश चौधरींच्या उमेदवारी अर्जातच झालेल्या चुकीने त्यांची उमेदवारी अपक्ष ठरली तर आज त्यांच्यावर माघार घेण्याची वेळ आली.
देवकरांच्या माघारीने स्पर्धा संपली
या निवडणुकीसाठी ५४९ मतदार आहेत. यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा वाटा मोठा आहे. त्यामुळे पक्षाने ठरविले असते तर देवकर बरीच मते मिळवू शकले असते. मात्र माघार घेणार्‍यांच्या रांगेत त्यांचा नंबर पहिला होता. त्यांनी माघार घेतल्याने भाजपाने गड अर्धा जिंकला अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर एक, एक जण माघारीसाठी पुढे येत गेला. गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करत असलेले उपमहापौर ललित कोल्हे, कॉँग्रेसच्या लता छाजेड, खाविआचे नगरसेवक नितीन बरडे यांच्यासह एकजण येत गेला व माघार घेत गेला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे स्वत: यासाठी प्रयत्न करत असल्याच लक्षात आले. केवळ ॲड. विजय पाटील यांचे मन वळविण्यात महाजन अपयश आले. बहुतांश राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपल्या उमेदवारांना बरोबर घेऊन येत होते व माघारीची प्रक्रिया पूर्ण करून घेत होते. जणू सर्वच राजकीय पक्षांची युती असल्याचे चित्र या माघारी निमित्ताने समोर आले. त्यामुळे भाजपाचे उमेदवार चंदुलाल पटेल यांना अपक्षांशी लढावे लागणार हे आता निि›त झाले आहे.
---

Web Title: The challenge for the seven independents continued. The competition ended with the defeat of Devshar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.