‘नीट’ वटहुकुमाला सुप्रीम कोर्टात आव्हान
By admin | Published: May 27, 2016 04:26 AM2016-05-27T04:26:13+5:302016-05-27T04:26:13+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशभरातील सामायिक प्रवेश परीक्षेच्या (नीट) कक्षेतून राज्य मंडळांना वगळण्यासंबंधी केंद्र सरकारच्या वटहुकुमाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Next
नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशभरातील सामायिक प्रवेश परीक्षेच्या (नीट) कक्षेतून राज्य मंडळांना वगळण्यासंबंधी केंद्र सरकारच्या वटहुकुमाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. व्यापमं घोटाळ्यातील व्हीसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेले इंदूरचे डॉक्टर आनंद राय यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर एक-दोन दिवसांत अवकाशकालीन खंडपीठाकडून सुनावणीची शक्यता आहे.