अरविंद केजरीवालांना टक्कर देणार फक्त 9 रुपये असणारा 'हा' उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 10:53 AM2020-01-15T10:53:05+5:302020-01-15T10:53:57+5:30

स्वामी यांनी आतापर्यंत 16 निडणुका लढवल्या आहे.

Challenger To Cm Arvind Kejriwal Files 3 Nominations With 9 Rs In Hand | अरविंद केजरीवालांना टक्कर देणार फक्त 9 रुपये असणारा 'हा' उमेदवार

अरविंद केजरीवालांना टक्कर देणार फक्त 9 रुपये असणारा 'हा' उमेदवार

Next

नवी  दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टक्कर देण्यासाठी राजकारणातील अनुभवी व्यक्ती तयार आहेत. यातच श्री वेंकटेश्वर महाराज स्वामी यांनाही अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. श्री वेंकटेश्वर महाराज स्वामी यांना दीपक या नावाने सुद्धा ओळखले जाते.

स्वामी यांनी आतापर्यंत 16 निडणुका लढवल्या आहे. ज्यामध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील आहेत. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्वामी यांनी एकूण तीन नामांकन अर्ज भरले आहे. यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि हिंदुस्तान जनता पार्टीकडून स्वामी यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. तसेच त्यांनी 10 हजार रुपये सिक्युरिटी सुद्धा जमा केली आहे. 

तुम्ही भाजपाचे अधिकृत उमेदवार आहात का? असा सवाल केल्यानंतर माझ्यावर भाजपाची नजर असेल, असे स्वामीजींनी सांगितले. भगवा पार्टी समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांवर नजर ठेवत आहे. मला आशा आहे की, समाजासाठी केलेल्या माझ्या कामावर प्रभावित होऊन मला आपले अधिकृत उमेदवार बनवू शकतात, असेही स्वामीजींनी सांगितले.

केजरीवाल को टक्कर देंगे स्वामीजी

मी आतापर्यंत समाजाची सेवा निस्वार्थ भावनेने केली आहे. आता दिल्लीत काम करण्याची इच्छा आहे. जर त्यांना (भाजपा) वाटत असेल की मी योग्य उमेदवार होऊ शकतो, तर मला विश्वास आहे की पार्टी माझे समर्थन करेल. तसेच, जर भाजपाने तिकीट दिले नाही तर त्या दोन पक्षांमधून कोण-ना-कोणतरी तिकिट आवश्य देईल, असे तीन पक्षांकडून नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर स्वामी यांनी सांगितले.  

स्वामी सध्या द्वारकामध्ये आपल्या एका मित्रासोबत राहत आहेत. दिल्लीत राहण्यासाठी कोणतेही ठिकाण नाही. आपल्या एका मित्रासोबत राहत आहे. मित्र बांधकाम मजूर आहे, असेही या स्वामींनी सांगितले आहे. नामांकन अर्ज भरताना त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात फक्त आपल्याजवळ 9 रुपये कॅश असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपले मित्र शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नव्हे) यांच्याकडून 99,999 रुपये उधार घेतले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या 

सीएएवर मलेशियाच्या पंतप्रधानांची आगपाखड, भारत असा शिकवणार धडा

शिवसेनेने केली भाजपसोबत हातमिळवणी; महाविकास आघाडीला फासला हरताळ

सोन्याच्या दागिन्यांवर देशभर आजपासून हॉलमार्किंग लागू; १४,१८ व २२ कॅरेटचेच विकले जाणार

आयात केलेला कांदा सडून जाण्याची भीती; दर कमी झाल्याने राज्यांकडून मागणी नाही

Web Title: Challenger To Cm Arvind Kejriwal Files 3 Nominations With 9 Rs In Hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.