बंगालमध्ये डाव्या पक्षांपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 03:23 AM2019-03-21T03:23:35+5:302019-03-21T09:06:30+5:30
डाव्या पक्षांची राजकीय ताकद गेल्या काही वर्षांत खूपच कमजोर झाली असून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालसह देशात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे लागणार आहेत.
कोलकाता - डाव्या पक्षांची राजकीय ताकद गेल्या काही वर्षांत खूपच कमजोर झाली असून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये
पश्चिम बंगालसह देशात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे लागणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये ३४ वर्षे केलेले राज्य हा डाव्या पक्षांसाठी रम्य भूतकाळ आहे. त्या राज्यात तृणमूल काँग्रेस सत्तेवर असून भाजपा मुसंडी मारण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे डावे पक्ष सध्या विरोधी बाकांवर असून त्यांचा अवकाश व्यापण्याची रणनीती भाजपाने आखली आहे.
अनेक मतदारसघ्ं ाात तण्ृ ामल्ू ा काग्ँ ास्े्र ा, भाजपा, डाव े पक्ष व काग्ँ ास्े्र ा अशा
चौरंगी लढती होणार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या (माकप) पॉलिट ब्यूरोचे सदस्य हन्नान मोला म्हणाले की, डाव्या पक्षांसाठी
या निवडणुका आव्हानात्मक आहेत. राज्यातील राजकारणात आम्ही असे कोपऱ्यात ढकलले जाऊ असे कधी वाटले नव्हते. तृणमूल काँग्रेसला भाजपा नव्हे तर डावे पक्ष हाच सुयोग्य पर्याय आहे हे जनतेच्या एक ना एक दिवस लक्षात येईल. (वृत्तसंस्था)
चौरंगी लढती
राज्यात डावी आघाडी व काग्ँ ास्े्र ा यांच्यात समझोता होईल, अशी चर्चा हात्े ाी. पण काग्ँ ास्े्र ामधील एका गटाचा
डाव्यांशी समझोता करायलाच विराध्े ा हात्े ाा. तसच्े ा काग्ँ ास्े्र ा जितक्या जागा मागत होती, तितक्या देण्यास डाव्यांची तयारी नव्हती. त्यामुळे तिथेआता डावी आघाडी, तृणमूल, भाजपा व काग्ँ ास्े्र ा अशी चारै ंगी लढत हाण्े ाार आहे. माकपबरोबर डाव्या आघाडीतील आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रेव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (आरएसपी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनीही आपले
उमेदवार राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी उभे केले आहेत.