राष्ट्रवादीचा विजयी रथ रोखण्याचे आव्हान (लक्षवेधी लढत प्रभाग क्र. १०० )
By admin | Published: April 15, 2015 12:03 AM2015-04-15T00:03:32+5:302015-04-15T00:03:32+5:30
नामदेव मोरे
Next
न मदेव मोरेनवी मुंबई : शहरातील प्रमुख लढतींमध्ये नेरूळमधील प्रभाग क्र. १०० चा समावेश होतो. हा प्रभाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. पालिकेच्या सर्व निवडणुकांमध्ये विजयी झालेले काँगे्रसचे एकमेव नगरसेवक या ठिकाणी नशीब आजमावत आहेत. यामुळे राष्ट्रवादी बालेकिल्ला राखणार, काँगे्रस नगरसेवकाची विजयी परंपरा कायम राहणार की भाजपा घुसखोरी करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नेरूळ सेक्टर-१९, १९ ए चा मिळून हा प्रभाग तयार झाला आहे. शहरातील लँडमार्क म्हणून ओळख असणारे वंडर्स पार्क या प्रभागात आहे. यशवंतराव चव्हाण उद्यान, मदर तेरेसा उद्यानासह आता काम सुरू असलेले आर. आर. पाटील स्मृती उद्यानही याच ठिकाणी असल्यामुळे उद्यानांचा प्रभाग म्हणूनही हा विभाग ओळखला जातो. अनेक वर्षांपासून हा प्रभाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. गेली १० वर्षे रवींद्र इथापे व सुरेखा इथापे येथे नगरसेवक आहेत. यावेळीही पक्षाने रवींद्र यांना उमेदवारी दिली आहे. काँगे्रसने ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेी यांना उमदेवारी दिली आहे. शेी पालिकेच्या पहिल्या निवडणुकीपासून चारही निवडणुका जिंकणारे एकमेव नगरसेवक आहेत. आरक्षणामुळे त्यांना मूळ प्रभाग सोडावा लागल्याने प्रभाग क्र. १०० मधून ते नशीब आजमावत आहेत. यामुळे आपली विजयी परंपरा कायम राखण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. भाजपाने संपत शेी यांना उमेदवारी दिली आहे. या तीन प्रमुख उमेदवारांव्यतिरिक्त एक अपक्ष उमेदवारही रिंगणात आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रभागात राष्ट्रवादी विरोधात इतर सर्व असा सामना रंगणार आहे. ...लोकसंख्या- २०११ च्या जनगणनेप्रमाणे या ठिकाणी ९१८८ लोकसंख्या असून ९५०१ मतदार आहेत. - भीमाशंकर सोसायटीमध्ये २ हजारपेक्षा जास्त मतदार आहेत. - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्यांची मोठ्या प्रमाणात वस्ती या परिसरात आहे. - सुशिक्षित, श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय नागरिकांची वस्ती म्हणूनही हा परिसर ओळखला जातो. फोटो१४ रवींद्र इथापे१४ संतोष शेी