Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगडमध्ये कमळ कोमेजलं, महापालिका निवडणुकीत 'आप' सर्वात मोठा पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 04:16 PM2021-12-27T16:16:57+5:302021-12-27T16:19:27+5:30

Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगड महानगरपालिका निवडणुकीच्या आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये आम आदमी पक्ष जोरदार मुसंडी मारली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्येच आपने भाजपाला जोराचा धक्का दिला होता.

Chandigarh Municipal Corporation Election Results: Lotus withered in Chandigarh munciple corporation election, Kejriwal's 'Aap' is the biggest party | Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगडमध्ये कमळ कोमेजलं, महापालिका निवडणुकीत 'आप' सर्वात मोठा पक्ष

Chandigarh Municipal Corporation Election Results: चंदीगडमध्ये कमळ कोमेजलं, महापालिका निवडणुकीत 'आप' सर्वात मोठा पक्ष

Next
ठळक मुद्देआपच्या उमेदवारांनी भाजपाच्या अनेक विद्यमान नगरसेवकांचा पराभव केला आहे. येथील एकूण 35 जागांचे कल हाती आले असून आप 14, काँग्रेस 8, भाजपा 12 आणि अकाली दल एका जागेवर विजयी झाले आहेत

चंदीगड - भाजपाचे वर्चस्व असलेल्या चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला आहे. राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा फटका भाजपला बसल्याचे दिसून येते. कारण, येथील महापालिका निवडणुकीत 35 जागापैकी 14 जागांवर विजय मिळवत आम आदमी पक्ष पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला आहे. तर, भाजपला 12 जागा जिंकता आल्याने भाजपची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. काँग्रेसने 8 जागा जिंकत तिसरे स्थान पटकावले. तब्बल 15 वर्षानंतर भाजपची येथे पिछेहट झाली आहे. 

चंदीगड महानगरपालिका निवडणुकीच्या आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये आम आदमी पक्ष जोरदार मुसंडी मारली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्येच आपनेभाजपाला जोराचा धक्का दिला होता. पालिकेतील वॉर्ड क्र. १७ मध्ये आम आदमी पक्षाच्या दमनप्रीत यांनी महापौर रविकांत यांना ८२८ मतांनी पराभूत केले. त्यामुळे येथील महापालिका निवडणुकीत यंदा सत्तांतर होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच, आम आदमी पक्षाने आता 14 जागा जिंकत येथे वर्चस्व निर्माण केले. 

दरम्यान, आपच्या उमेदवारांनी भाजपाच्या अनेक विद्यमान नगरसेवकांचा पराभव केला आहे. येथील एकूण 35 जागांचे कल हाती आले असून आप 14, काँग्रेस 8, भाजपा 12 आणि अकाली दल एका जागेवर विजयी झाले आहेत. यावेळी चंढीगडच्या निकालांनी सर्वच राजकीय पंडितांना धक्का दिला आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेस आणि भाजपाला जोरदार टक्कर दिली. या निकालानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन हे बदलाचे संकेत असल्याचं म्हटलंय. 


आपच्या सर्वच विजयी उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन. चंदीगढ महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचा झालेला विजय हा येणाऱ्या बदलाचे संकेत आहेत. चंदीगढच्या लोकांनी भ्रष्ट राजकारणाला नाकारत आपच्या प्रामाणिक राजकारणाचा स्विकार केल्याचे केजरीवाल यांनी म्हटलंय. 

चंदीगड महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी ६० टक्के मतदान झाले होते. येथील प्रभागांची संख्या २०१६ मध्ये २६ होती. तर आता ही संख्या वाढून ३५ करण्यात आली आहे. येथील निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये मुख्य लढत असते. मात्र आता आम आदमी पक्षही मैदानात उतरल्याने लढत तिरंगी झाली आहे.  
 

Web Title: Chandigarh Municipal Corporation Election Results: Lotus withered in Chandigarh munciple corporation election, Kejriwal's 'Aap' is the biggest party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.