चंदीगड महापालिकेत आपने जिंकल्या १४ जागा, भाजपचे महापौर शर्मा झाले पराभूत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 06:22 AM2021-12-28T06:22:00+5:302021-12-28T06:23:55+5:30

Chandigarh Municipal Corporation : महापौरपदासाठी पक्षाला १९ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे.

In Chandigarh Municipal Corporation, you won 14 seats, BJP's Mayor Sharma lost | चंदीगड महापालिकेत आपने जिंकल्या १४ जागा, भाजपचे महापौर शर्मा झाले पराभूत 

चंदीगड महापालिकेत आपने जिंकल्या १४ जागा, भाजपचे महापौर शर्मा झाले पराभूत 

Next

- बलवंत तक्षक

चंदीगड : चंदीगड महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) ३५ पैकी १४ जागा जिंकून सगळ्यात मोठ्या पक्षाचे स्थान मिळवले तर भाजपला १२, काँग्रेसला ८ आणि एक जागा शिरोमणी अकाली दलाला जिंकता आली. महापौरपदासाठी पक्षाला १९ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे.

पक्षाच्या कामगिरीमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खूपच आनंदी आहेत. त्यांनी ट्वीटवर म्हटले की, “या यशामुळे पंजाबमध्येही बदल घडेल, असे संकेत मिळतात. राज्यात फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक होत आहे. चंदीगढमधील मतदारांनी भ्रष्ट राजकारण करणाऱ्यांना नाकारून ‘आप’ च्या प्रामाणिक राजकारणाला निवडून दिले आहे.”

काँग्रेसलाही नाकारले
 २४ डिसेंबरला मतदान झाले व ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले. सोमवारी सकाळी मतमोजणी झाली. काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या तुलनेत आपचे उमेदवार अनुभवी नव्हते तरीही मतदारांनी दोन्ही मोठ्या पक्षांना नाकारून ‘आप’वर विश्वास टाकला. 
 भाजपचे महापौर रविकांत शर्मा यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

Web Title: In Chandigarh Municipal Corporation, you won 14 seats, BJP's Mayor Sharma lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.