इराकमध्ये सात तरुण अडकले, कुटुंबीयांचे मदतीसाठी सरकारकडे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 12:19 PM2019-06-13T12:19:55+5:302019-06-13T12:22:53+5:30
हरसिमरत कौर बादल यांनी तरुणांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आवाहनानंतर परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांना पत्र लिहिले आहे.
चंदीगड : पंजाबमधील सात तरुण इराकमध्ये अडकले आहे. हे तरुण जालंधर आणि कपूरथला जिल्ह्यातील आहेत. या तरुणांना भारतात आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्याकडे मदत करण्याचे आवाहन केले आहे.
हरसिमरत कौर बादल यांनी तरुणांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आवाहनानंतर परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. इराकमध्ये गेल्या सात महिन्यांपासून अडकलेल्या या तरुणांना भारतात सुरक्षित आणण्यासाठी मदत करावी, अशी विनंती हरसिमरत कौर बादल यांनी पत्रातून डॉ. एस जयशंकर यांना केली आहे.
यावेळी हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले की, 'इराकमध्ये अडकलेल्या तरुणांसाठी त्यांच्या कुटुंबीयांसोबत डॉ. एस जयशंकर यांनी भेट घेणार आहे. तसेच, डॉ. एस जयशंकर पत्र लिहून या जालंधर आणि कपूरथला जिल्ह्यातील सात तरुणांच्या सुरक्षित भारतात आण्यासाठी मदत करण्यास सांगितले आहे.'
इराकमध्ये तरुणांवर बिकट परिस्थिती ओढावली आहे, कारण वर्क परमिट नसल्यामुळे त्याठिकाणी राहण्यासाठी काम सुद्धा करता येणार नाही. या तरुणांना विमानाने भारतात आणण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च अकाली दलकडून केला जाईल. तसेच, इराकमध्ये नोकरीचे आमिष दाखवून दोन ट्रॅव्हल एजन्टनी या तरुणांची फसवणूक केली आहे. ट्रॅव्हल एजन्टनी तरुणांकडून पैसे घेतले, मात्र त्यांना कागदपत्रे दिली नाहीत. कागदपत्रे दिली असती तर हे तरुण इराकमध्ये काम मिळाले असते, असेही हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले.