Chandipura Virus : चिंताजनक! गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा कहर; आतापर्यंत ४८ मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 11:02 AM2024-07-27T11:02:02+5:302024-07-27T11:16:33+5:30

Chandipura Virus : गुजरातमध्ये चांदीपुराच्या व्हायरसमुळे आतापर्यंत ४८ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर १२७ नवीन प्रकरणं दाखल झाली आहेत. अनेकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Chandipura Virus gujarat rajasthan death symptoms treatment | Chandipura Virus : चिंताजनक! गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा कहर; आतापर्यंत ४८ मुलांचा मृत्यू

Chandipura Virus : चिंताजनक! गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा कहर; आतापर्यंत ४८ मुलांचा मृत्यू

मान्सूनमुळे चांदीपुरा व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये चांदीपुराच्या व्हायरसमुळे आतापर्यंत ४८ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर १२७ नवीन प्रकरणं दाखल झाली आहेत. अनेकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा धोकादायक व्हायरस गुजरात आणि राजस्थानमधील लोकांना लक्ष्य करत आहे. केंद्रीय पथकाने अरावली येथे परिस्थितीचा आढावा घेतला. 

अरावली जिल्ह्यातील चांदीपुरम प्रकरणासंदर्भात केंद्र सरकारचे पथक पुण्याहून पोहोचले. ज्यांनी बाधित भागांत भेट दिली. या पथकाने जिल्ह्यातील भिलोडा आणि मेघराज तालुक्यातील विविध भागातून रक्ताचे नमुने गोळा केले. हे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

डॉ. अर्पित ओबेरॉय यांच्या मते, चांदीपुरा व्हायरस अतिशय धोकादायक आहे. याची सुरुवात सर्वप्रथम नागपुरातील चांदीपूर येथून झाली. चांदीपुरा व्हायरस हा विशेषतः १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आढळतो. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, उलट्या आणि फ्लू ही त्याची लक्षणं आहेत. यामुळे गंभीर एन्सेफलायटीस देखील होतो. ही एक स्थिती आहे ज्यामुळे मेंदूला सूज येते.

लहान मुलांवर अटॅक करतो चांदीपुरा व्हायरस

चांदीपुरा व्हायरस हा एक प्रकारचा आरएनए व्हायरस आहे, जो घरांमध्ये आढळतो. लहान मुलांवर तो अटॅक करतो. यासाठी लहान मुलांना पूर्ण कपडे घाला. शरीर पूर्णपणे झाकून ठेवा. जास्त ताप आल्यासारखं जाणवत असेल किंवा तशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. हे टाळण्यासाठी स्वच्छतेकडे योग्य लक्ष द्या.

चांदीपुरा व्हायरस असं नाव का ठेवलं?

१९६५ मध्ये नागपूर शहरातील चांदीपुरा येथे एका नवीन व्हायरस प्रादुर्भाव दिसून आला. १२ ते १५ वर्षे वयोगटातील अनेक मुलांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. कारण हा व्हायरस देशात पहिल्यांदा नागपूरच्या चांदीपुरा गावातून आला होता, म्हणूनच या व्हायरसला चांदीपुरा व्हायरस म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
 

Web Title: Chandipura Virus gujarat rajasthan death symptoms treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य