चांदिवली, कुर्ला मतदारसंघ

By Admin | Published: September 26, 2014 09:40 PM2014-09-26T21:40:55+5:302014-09-26T21:40:55+5:30

चांदिवली मतदारसंघ

Chandivali, Kurla constituency | चांदिवली, कुर्ला मतदारसंघ

चांदिवली, कुर्ला मतदारसंघ

googlenewsNext
ंदिवली मतदारसंघ

चांदिवली विधानसभा मतदार संघात सध्या नसीम खान विद्यमान आमदार आहेत. चांदिवलीत केलेली विकासकामे हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे. तर मनसेकडून ईश्वर तायडे हे रिंगणात आहेत. नवा चेहरा आणि नगरसेवक म्हणून केलेली कामे ही त्यांच्या जमेची बाजू आहे. या मतदारसंघावर उत्तरभारतीय, मुस्लीम आणि दलित मतदारांचा प्रभाव आहे. शिवसेना आणि भाजपचे उमेदवार हे हिंदी भाषिक असण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे उत्तर भारतीय मतांची विभागणी कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक शरद पवार राष्ट्रवादीकडून रिंगणात असण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून हरिष शुक्ला, प्रकाश शुक्ला तर भाजपकडून सीताराम तिवारी यांची नावे चर्चेत आहेत. २००९मध्ये नसीम खान यांनी मनसेला ३३ हजार ७१५ मतांनी पराभूत केले होते. पण लोकसभेत मात्र चांदिवलीतून भाजपला आघाडी मिळाली होती.
...............................................
कुर्ला मतदारसंघ

कुर्ला मतदारसंघ हा एनसीपीचा बालेकिल्ला मानला जातो. पण यंदा काँग्रेस त्यांच्याविरुद्ध उभी ठाकण्याची शक्यता आहे. मुस्लीम, दलीत मतदार बहुल मतदारसंघ असल्याने तसेच एससी राखीव असल्याने येथील समीकरणे या मतदारांभोवतीच फिरणार आहेत. मिलिंद (अण्णा) विद्यमान आमदार आहेत. मतदार संघात केलेली कामे ते मतदारांसमोर घेऊन जातील. तर मनसेने स्नेहल जाधव यांच्या रुपात नवा चेहरा देण्याचा प्रयत्न येथे केला आहे. शिवसेनेकडून मंगेश कुडाळकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले विजय कांबळे मिलिंद कांबळे यांना आव्हान देण्याची शक्यता आहे. विकास कामांचा दावा मिलिंद कांबळे करत असले तरी मतदार संघात अनेक समस्या आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ राखणे राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. २००९ मध्ये मिलिंद कांबळे यांनी शिवसेनेला ६ हजार ९७१ मतांनी पराभूत केले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपला कुर्ला मतदार संघातून आघाडी मिळाली होती.
...............................................

Web Title: Chandivali, Kurla constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.