आकाशात तब्बल १ तास दिसणार चंद्राचे साजिरे रूप; जाणून घ्या चंद्रग्रहणाबद्दलच्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 04:28 PM2023-10-23T16:28:35+5:302023-10-23T16:29:54+5:30

Chandra Grahan 2023: चंद्रगहण ही अनेक देशांमध्ये एक विलक्षण वैज्ञानिक घटना मानली जाते

Chandra Grahan 2023 When is Lunar Eclipse know Date Time Visibility and special features | आकाशात तब्बल १ तास दिसणार चंद्राचे साजिरे रूप; जाणून घ्या चंद्रग्रहणाबद्दलच्या खास गोष्टी

आकाशात तब्बल १ तास दिसणार चंद्राचे साजिरे रूप; जाणून घ्या चंद्रग्रहणाबद्दलच्या खास गोष्टी

Chandra Grahan 2023: चंद्रग्रहण ही भारतासह जगातील अनेक देशांमध्ये एक विलक्षण वैज्ञानिक घटना मानली जाते. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये हे ग्रहण 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण म्हणून दिसणार आहे. हे ग्रहण भारतात सुमारे एक तास 20 मिनिटे चालेल. असे सांगण्यात येत आहे की भारतात ग्रहण सकाळी 11:31 वाजता सुरू होईल आणि 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:36 वाजता समाप्त होईल. 28 ऑक्टोबरच्या रात्री शनिवारी मध्यरात्रीपासून चंद्र सावलीत प्रवेश करेल. त्यानंतर पुढील चंद्रग्रहण थेट 7 सप्टेंबर 2025 रोजी दिसणार आहे.

शास्त्रज्ञांसाठी आश्चर्याची बाब-

चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणाइतके दुर्मिळ नाही. नासाच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी एक किंवा दोनदा किंवा त्याहून अधिक वेळा पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एक 'शॅडो प्ले' म्हणजे सावल्यांची विशेष आकृती तयार करण्यासाठी योग्य मार्गाने येतात, ज्याला आपण ग्रहण म्हणतो. चंद्रग्रहणांचे तीन प्रकार आहेत - खग्रास, खंडग्रास आणि उपछाया. ५ मे नंतरचे हे दुसरे चंद्रग्रहण आहे. अनेक शतकांपासून चंद्रग्रहण ही आश्चर्याची बाब आहे आणि शास्त्रज्ञांनी नेहमीच याला एक रहस्यमय घटना म्हटले आहे. स्टारगेझर्स आणि खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठीही चंद्रग्रहण ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे.

चंद्रग्रहण का होते?

जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये स्थित असते तेव्हा चंद्रग्रहण होते. यामुळे चंद्रावर सावली पडते. ही घटना विशेषत: पौर्णिमेच्या वेळी घडते; ज्यावेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र पूर्णपणे संरेखित असतात. चंद्रग्रहणादरम्यान, पृथ्वी सूर्यप्रकाशाला चंद्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखते, ज्यामुळे चंद्राला एक विशिष्ट लाल-तपकिरी किंवा केशरी रंग मिळतो. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही, पण चंद्राने पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करताना उघड्या डोळ्यांनी पाहणे पूर्णपणे सुरक्षित मानले जाते.

भारतासह आणखी कुठे दिसणार?

संपूर्ण भारतभर हे चंदग्रहण दिसणार आहे. याशिवाय, ते पश्चिम प्रशांत महासागर, ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, आफ्रिका, पूर्व दक्षिण अमेरिका, ईशान्य उत्तर अमेरिका, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि दक्षिण प्रशांत महासागर व्यापणाऱ्या क्षेत्रातही दिसेल.

Web Title: Chandra Grahan 2023 When is Lunar Eclipse know Date Time Visibility and special features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.