ममता बॅनर्जीं विरोधात चंद्र कुमार बोस निवडणूक रिंगणात

By admin | Published: March 9, 2016 09:49 PM2016-03-09T21:49:51+5:302016-03-09T21:49:51+5:30

आगामी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस निवडणूक लढवणार आहेत.

Chandra Kumar Bose against Mamata Banerjee in the election fray | ममता बॅनर्जीं विरोधात चंद्र कुमार बोस निवडणूक रिंगणात

ममता बॅनर्जीं विरोधात चंद्र कुमार बोस निवडणूक रिंगणात

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ९ - आगामी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस निवडणूक लढवणार आहेत. ते भाजपच्या तिकीटावर ममता बॅनर्जी यांना आव्हान देणार आहेत. 
 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी भाजप मुख्यालयात चंद्र कुमार बोस यांच्या नावाची घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये बदल घडवण्याची वेळ आली आहे. भाजप हा बदल घडवेल असे चंद्र कुमार बोस यांनी सांगितले. 
 
काँग्रेस आणि सीपीएमने नेहमीच एकत्र काम केले आहे, आता फक्त त्यावरुन पडदा उठला आहे, मालदामध्ये भाजप हिंदू मतांसाठी प्रचार करणार आणि काँग्रेस मुस्लिममतांसाठी, या सर्वामध्ये तोटा लोकांचा होणार आहे असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मालदा येथे सभेत म्हणाल्या. 

Web Title: Chandra Kumar Bose against Mamata Banerjee in the election fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.