मोठी बातमी! चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांनी झाडल्या गोळ्या, रूग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 06:14 PM2023-06-28T18:14:11+5:302023-06-28T18:14:27+5:30

Chandra Shekhar Aazad : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला.

Chandra Shekhar Aazad, national president of Aazad Samaj Party Kanshi Ram and Bhim Army leader's convoy attacked by armed men in Saharanpur, read here | मोठी बातमी! चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांनी झाडल्या गोळ्या, रूग्णालयात दाखल

मोठी बातमी! चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांनी झाडल्या गोळ्या, रूग्णालयात दाखल

googlenewsNext

नवी दिल्ली : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या देवबंद येथे पोहचताच भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात आझाद जखमी झाले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. चंद्रशेखर हे त्यांच्या वाहनाने देवबंद दौऱ्यावर जात होते. तेव्हा अचानक अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळी स्पर्श करून गेल्याने त्यांना दुखापत झाली असून गाडीवर देखील गोळ्यांचे निशाण दिसत आहेत. 

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये काही अज्ञातांनी हा हल्ला केला. "अर्ध्या तासापूर्वी चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर कारमधून आलेल्या काही लोकांनी गोळीबार केला. एक गोळी त्यांच्याजवळून गेली. ते आता ठीक असून त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सीएचसीमध्ये नेण्यात आले आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत", अशी माहिती एसएसपी डॉ विपिन टाडा यांनी दिली.

दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांनी या हल्ल्याबद्दल म्हटले, "मला आठवत नाही पण आमच्या लोकांनी त्यांना ओळखले आहे. त्यांची गाडी सहारनपूरच्या दिशेने गेली. आम्ही यू टर्न घेतला. आमची गाडी एकटी होती, ते एकूण ५ जण होते. आमच्या सहकारी डॉक्टरांनाही गोळी लागली असेल." 

Web Title: Chandra Shekhar Aazad, national president of Aazad Samaj Party Kanshi Ram and Bhim Army leader's convoy attacked by armed men in Saharanpur, read here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.