चंद्राबाबूंनी केले मुलालाही मंत्री

By admin | Published: April 3, 2017 04:54 AM2017-04-03T04:54:20+5:302017-04-03T04:54:20+5:30

वायएसआर काँग्रेसमधून तेलुगु देसममध्ये सहभागी झालेल्या चार आमदारांसह सहा जणांचा रविवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला

Chandrababu's son is also the minister | चंद्राबाबूंनी केले मुलालाही मंत्री

चंद्राबाबूंनी केले मुलालाही मंत्री

Next

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव नारा लोकेश व वायएसआर काँग्रेसमधून तेलुगु देसममध्ये सहभागी झालेल्या चार आमदारांसह सहा जणांचा रविवारी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. तर, पाच मंत्र्यांना मंत्रिमंंडळातून काढून टाकण्यात आले आहे. विधानसभेत वायएसआर काँग्रेसचे ६७ आमदार होते. फेब्रुवारी २०१६ पासून यातील २१ आमदार तेलुगु देसमसोबत गेले आहेत.
तेलगु देसम- भाजपचे सरकार ८ जून २०१४ रोजी आल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळातील हा पहिला मोठा बदल आहे. यामुळे सत्तारुढ तेलुगु देसममध्येही असंतोष वाढला आहे. मंत्रिपदावरुन हटविण्यात आलेले एक मंत्री बी. गोपाल कृष्ण रेड्डी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चित्तूरचे आमदार असलेल्या रेड्डी यांनी रविवारी सकाळीच विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्याची एक प्रत मुख्यमंत्र्यांकडेही पाठविली आहे. तथापि, चंद्राबाबू नायडू यांनी बी गोपाल कृष्ण रेड्डी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून मंत्रिपदावरुन काढण्यामागची कारणे सांगितली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यपाल ई. एस. एल. नरसिम्हन यांनी नव्या मंत्र्यांना वेलागपुडी येथे राज्य
सरकारच्या मुख्यालयाजवळ एका कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आंध्र्र प्रदेशातील मंत्र्यांची संख्या
आता २६ झाली आहे. यात
विधान परिषदेतील चार सदस्य आहेत. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या वायएसआरच्या चार आमदारात आर. व्ही. सुजाय कृष्ण राव, भूमा अखिल
प्रिया, सी. आदिनारायण
रेड्डी आणि एन. अमरनाथ रेड्डी यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
>हा तर घटनेचा अपमान
वायएसआरमधून तेलुगु देसमकडे गेलेल्या चार आमदारांना मंत्री करण्यात आल्यानंतर वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, हा घटनेचा आणि राज्याचा घोर अपमान आहे. आंध्रप्रदेशच्या राजकीय इतिहासातील हा काळा दिवस आहे. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असूनही या घटनात्मक उल्लंघनात ते सहभागी झाले.

Web Title: Chandrababu's son is also the minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.