आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंची टीडीपी भुईसपाट, वायएसआर कॉंग्रेसने लावली वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 02:05 PM2019-05-23T14:05:07+5:302019-05-23T14:06:10+5:30
आंध्र प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कोंग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे
हैदराबाद - लोकसभा निवडणुकीत भाजपाला देशभरात मोठे यश मिळाले आहे. मात्र, दक्षिण भारतात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यात भाजापाने घवघवीत यश मिळाल्याचे दिसून येत आहे. पण, दक्षिणेतील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये भाजपाची चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे. आंध्र प्रदेशमधील 25 जागांपैकी जवळपास 25 लोकसभा मतदारसंघात वायएसआर कोंग्रेसला मोठे यश मिळाले आहे. सत्तारूढ टीडिपी पक्षाचा मोठा पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे.
आंध्र प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कोंग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या टीडिपी पक्षाला धूळ चारत मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे दिसून येते. वायएसआर कोंग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी हा विजय जनता आणि देवाच्या कृपाशीर्वादानेच मिळाल्याचे म्हटले. सध्याच्या आकडेवारीनुसार वायएसआर रेड्डीच्या कोंग्रेस पक्षाला सर्वच 25 जागांवर आघाडी मिळत असल्याचे दिसून येते. तर, चंद्राबाबू यांच्या टिडीपि पक्षाला खातेही खोलता येणार की नाही, अशीच परिस्थिति दिसत आहे. तसेच विधानसभा निवडणूकमध्येही वायएसआर कॉंग्रेसला 150 पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान,टीडिपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी पराभवाबद्दल निवडणूक आयोगाला दोषी ठरवले असून आजचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.
ఇక రాజన్న రాజ్యం దిశగా ఆంధ్రప్రదేశ్#YSRCPWinningAP#APWithYSJagan#Electionsresults2019pic.twitter.com/fkw7HBY0TU
— YSR Congress Party (@YSRCParty) May 23, 2019