चंद्रगुप्त, अशोका यांच्या रांगेत मोदी, दुरदर्शनवर येणार मालिका
By admin | Published: May 5, 2015 09:57 AM2015-05-05T09:57:33+5:302015-05-05T10:05:18+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता चंद्रगुप्त मौर्य, अशोका यांच्या रांगेत बसवले जाणार असून दुरदर्शनवर लवकरच मोदी यांच्या समाजावर आधारित मालिका झळकणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
गांधीनगर, दि. ५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता चंद्रगुप्त मौर्य, अशोका यांच्या रांगेत बसवले जाणार असून दुरदर्शनवर लवकरच मोदी यांच्या समाजावर आधारित मालिका झळकणार आहे. मोदींच्या घांची तेली समाजाचा दैदिप्यमान इतिहास या मालिकेतून दाखवला जाणार असून पुण्यातील सुरेश चौधरी या मालिकेची निर्मिती करत आहेत.
गुजरातमधील गांधीनगर येथे 'दिये जलते है' या मालिकेच्या चित्रीकरणाला सोमवारी सुरुवात झाली. या मालिकेत आई तिच्या लहान मुलाला घांची तेली समाजाचा दैदिप्यमान इतिहास सांगते असे या कथेचे स्वरुप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घांची तेली समाजातील असून चंद्रगुप्त मौर्य व अशोका हेदेखील याच समाजातील असल्याचा दावा मालिकेत करण्यात येणार आहे. ही मालिका १२८ भागांमध्ये प्रसारित होईल. ऑक्टोंबरमध्ये ही मालिका दुरदर्शनवर झळकेल असे सूत्रांनी सांगितले. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू उपस्थित होते. आपल्या समाजातील या दिग्गज व्यक्तींवर मालिका निघणे ही गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले आहे.