नागझिरी शिवारात पुन्हा चंदनाच्या झाडाची चोरी
By admin | Published: July 14, 2016 09:36 PM2016-07-14T21:36:52+5:302016-07-14T21:36:52+5:30
जळगाव: तालुक्यातील नागझिरी शिवारात मिलिंद प्रल्हाद चौधरी (रा.जळगाव) यांच्या शेतातून पुन्हा चंदनाच्या चार झाडांची चोरी झाली आहे. गुरुवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. चौधरी यांचे नागझिरी शिवारात गट नं.१३१ (२) मध्ये शेत आहे. त्यात पंधरा वर्षापूर्वी त्यांनी चंदनाच्या झाडांची लागवड केली होती. गेल्या पंधरवड्यातही या शेतातील ५० ते ६० झाडे कोणीतरी तोडून नेली होती. याबाबत चौधरी यांनी तालुका पोलिसात तक्रार केली होेती. त्याचा तपास लागत नाही तोच पुन्हा १६ हजार रुपये किमतीची चार झाडे चोरट्यांनी तोडून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. आता पुन्हा चौधरी यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली, त्यावरुन गुन्ाची नोंद करण्यात आली आहे.
Next
ज गाव: तालुक्यातील नागझिरी शिवारात मिलिंद प्रल्हाद चौधरी (रा.जळगाव) यांच्या शेतातून पुन्हा चंदनाच्या चार झाडांची चोरी झाली आहे. गुरुवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. चौधरी यांचे नागझिरी शिवारात गट नं.१३१ (२) मध्ये शेत आहे. त्यात पंधरा वर्षापूर्वी त्यांनी चंदनाच्या झाडांची लागवड केली होती. गेल्या पंधरवड्यातही या शेतातील ५० ते ६० झाडे कोणीतरी तोडून नेली होती. याबाबत चौधरी यांनी तालुका पोलिसात तक्रार केली होेती. त्याचा तपास लागत नाही तोच पुन्हा १६ हजार रुपये किमतीची चार झाडे चोरट्यांनी तोडून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. आता पुन्हा चौधरी यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली, त्यावरुन गुन्ाची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, काही दिवसापूर्वी आव्हाणे शिवारातूनही डॉ.गिरीश गाजरे यांच्या शेतातून चंदनाची झाडे तोडून नेण्यात आली होती, त्याचीही पोलिसात तक्रार दाखल आहे. चंदन झाड तोडणारी टोळीच सक्रिय असल्याचा संशय आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले असते तर कदाचित झाडे तोडणारे चोरटे मिळून आले असते, परंतु पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने न घेतल्याने झाडे तोडण्याचे प्रमाण वाढले आहे.