Chandrayaan-2: चंद्रावर लँडिंगचा मुहूर्त ठरला; ७ सप्टेंबरला 'ही' वेळ अचूक साधणार 'विक्रम'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 12:21 PM2019-08-20T12:21:23+5:302019-08-20T12:22:17+5:30
Chandrayaan 2 Update: चंद्राकडे झेपावलेले इस्रोचे चांद्रयान-2 ने आज महत्त्वाचा टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. या मोहिमेतील दोन महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे.
बंगळुरू - चंद्राकडे झेपावलेले इस्रोचेचांद्रयान-2 ने आज महत्त्वाचा टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. या मोहिमेतील दोन महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी चांद्रयानापासून लँडर विक्रम वेगळा होईल. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी विक्रम हा चंद्राच्या पृष्टभागावर लँड करणार आहे, असी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी आज सांगितले.
चांद्रयान -2 यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत दाखल झाल्यानंतर इस्रोच्या प्रमुखांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आतापर्यंतच्या मोहिमेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मोहिमेतील पुढील टप्प्यांविषयी माहिती दिली. ''या मोहिमेतील पुढील महत्त्वाचा टप्पा 2 सप्टेंबर रोजी येईल. त्यादिवशी लँडर विक्रम हा ऑर्बिटरपासून वेगळा होईल. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी आम्ही काही सेकंदांसाठी इंजिनाची चाचणी घेऊन लँडरमधील प्रणाली व्यवस्थित चालू आहे की नाही याची चाचपणी करणात आहोत.'', असे सिवान यांनी सांगितले.
ISRO Chief K Sivan: Next major event will happen on 2nd September when the lander will be separated from the orbiter. On 3rd September we will have a small maneuver for about 3 seconds to ensure that the systems of the lander are running normally. #Chandrayaan2pic.twitter.com/gZjhR8QUL6
— ANI (@ANI) August 20, 2019
यावेळी सीवान यांनी चंद्रावर उतरण्याची वेळही जाहीर केली. '' 7 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी लँडर विक्रम हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्टभागावर उतरेल. असे त्यांनी सांगितले.
Indian Space Research Organisation (ISRO) Chief K Sivan: On 7th September, at 1:55 am lander will land on the moon. #Chandrayaan2pic.twitter.com/rJiWfJlbaP
— ANI (@ANI) August 20, 2019
पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर हे 3 लाख 84 हजार किलोमीटर आहे. चांद्रयान-2 द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी 4 दिवसाआधी रोव्हर 'विक्रम' उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल. त्यानंतर 6 ते 7 सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे 4 तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. 15 मिनिटांच्या आतमध्ये इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.