Chandrayaan-2: 'नासा'ने जागवल्या आशा; १७ सप्टेंबरला चंद्रावरून येऊ शकते 'शुभवार्ता'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 12:32 PM2019-09-13T12:32:55+5:302019-09-13T12:35:14+5:30

Chandrayaan 2 : विक्रमशी संपर्क साधण्याचे इस्रोचे प्रयत्न सुरूच आहेत आणि अख्खा देश त्यांच्या पाठीशी उभा आहे.

Chandrayaan 2 nasa lunar orbiter to pass over vikram landing site on 17 september | Chandrayaan-2: 'नासा'ने जागवल्या आशा; १७ सप्टेंबरला चंद्रावरून येऊ शकते 'शुभवार्ता'

Chandrayaan-2: 'नासा'ने जागवल्या आशा; १७ सप्टेंबरला चंद्रावरून येऊ शकते 'शुभवार्ता'

googlenewsNext
ठळक मुद्देविक्रम लँडर चंद्रापासून अवघा २ किलोमीटर दूर असताना त्याचा इस्रोशी संपर्क तुटला.येत्या १७ सप्टेंबरला 'नासा'चा ऑर्बिटर 'विक्रम'च्या लँडिंग साईटवरून भ्रमण करणार आहे. विक्रम लँडरच्या सद्यस्थितीचे काही फोटो इस्रोला मिळू शकतात.

भारताचं 'चांद्रयान-२' चंद्रावर सुखरूप पोहोचल्याचा 'विक्रम' ७ सप्टेंबरला होता-होता राहिला. विक्रम लँडर चंद्रापासून अवघा २ किलोमीटर दूर असताना त्याचा इस्रोशी संपर्क तुटला आणि संपूर्ण देश हळहळला. पण, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आणि भारतीयांनी आशा सोडलेली नाही. विक्रमशी संपर्क साधण्याचे इस्रोचे प्रयत्न सुरूच आहेत आणि अख्खा देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. अशातच, सगळ्यांची उमेद वाढवणारी बातमी 'नासा'कडून आली आहे. येत्या १७ सप्टेंबरला 'नासा'चा ऑर्बिटर 'विक्रम'च्या लँडिंग साईटवरून भ्रमण करणार आहे. त्यावेळी तो या ठिकाणची दृश्यं कॅमेऱ्यात टिपू शकतो आणि त्यात विक्रम लँडरच्या सद्यस्थितीचे काही फोटो इस्रोला मिळू शकतात.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चांद्रयान-२ मोहिमेचं नासानं मुक्तकंठाने कौतुक केलं होतं. भविष्यातील महत्त्वाकांक्षी मोहिमांवर एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त करतानाच, विक्रम लँडरचा शोध घेण्यासाठी मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली होती. त्यानुसारच, आता १७ सप्टेंबरला नासाकडून काहीतरी ठोस इनपुट्स इस्रोला मिळू शकतात. इस्रोला विक्रम लँडरची थर्मल इमेज मिळाली आहे. ती इस्रोनं अद्याप प्रसिद्ध केलेली नाही. परंतु, हार्ड लँडिंगमुळे विक्रमच्या काही भागाचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्याबद्दल आणखी थोडी 'सुस्पष्ट' कल्पना नासा ऑर्बिटरच्या फोटोंमधून येऊ शकते. 

नासाच्या ऑर्बिटरमध्ये हाय रिझोल्यूशन कॅमेरे आहेत. काही दिवसांपूर्वी या ऑर्बिटरने अपोलो-११ च्या लँडिंग साईटचे फोटो पाठवले होते. त्यात ५० वर्षांपूर्वीचे पावलांचे ठसेही स्पष्ट दिसत आहेत. तसंच, इस्रायलच्या क्रॅश झालेल्या यानाचे फोटोही ऑर्बिटरने टिपले होते आणि तेही अत्यंत स्पष्ट होते. आता १७ सप्टेंबरला नासाचा ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साईटवरून जाणार असल्याची माहिती प्रोजेक्ट सायंटिस्ट नोआह पेत्रो यांनी स्पेसफ्लाइट नाऊला दिली आहे. या ऑर्बिटरकडून येणारे फोटो इस्रोच्या विश्लेषणासाठी उपयुक्त ठरतील, असं त्यांनी म्हटलंय.

चांद्रयान-२ शी संबंधित महत्त्वाच्या बातम्याः

हॅलो विक्रम! संपर्क तुटलेल्या यानाला नासाने पाठवला संदेश 

Chandrayaan 2: लँडर विक्रमशी संपर्क न झाल्यास पुढे काय? जाणून घ्या इस्रोची योजना

Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या 'या' उत्तराने जिंकली सर्वांची मनं

 

Web Title: Chandrayaan 2 nasa lunar orbiter to pass over vikram landing site on 17 september

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.