Chandrayaan-2: ...त्यामुळे चंद्रावर उतरताना विक्रम लँडर झाला क्रॅश, प्राथमिक तपासातून मिळाले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 09:31 AM2019-09-20T09:31:09+5:302019-09-20T09:37:00+5:30

चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने इस्रोसह कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली होती. मात्र त्यानंतरही विक्रमशी संपर्क साधला जाईल अशी आशा देशाला होती. मात्र...

Chandrayaan-2: ...Vikram lander crashed maybe due to problem in landing program | Chandrayaan-2: ...त्यामुळे चंद्रावर उतरताना विक्रम लँडर झाला क्रॅश, प्राथमिक तपासातून मिळाले संकेत

Chandrayaan-2: ...त्यामुळे चंद्रावर उतरताना विक्रम लँडर झाला क्रॅश, प्राथमिक तपासातून मिळाले संकेत

Next
ठळक मुद्देऑटोमॅटिक लँडिंग प्रोग्रॅममध्ये झालेल्या गडहडीमुळे विक्रम लँडरला अपघात झाला असावाविक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करणे हे अशक्यप्राय झाले असल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने इस्रोसह कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली

बंगळुरू -  चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर क्रॅश लँडिंग झाल्याने इस्रोसह कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली होती. मात्र त्यानंतरही विक्रमशी संपर्क साधला जाईल अशी आशा देशाला होती. मात्र विक्रमशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करणे हे अशक्यप्राय झाले असल्याचे शास्त्रज्ञांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. विक्रमशी संपर्क तुटल्यानंतर काही वेळातच लूनर क्राफ्ट क्रॅश लँडिंगनंतर पूर्णपणे नष्ट झाल्याचा अंदाज इस्रोच्या शास्त्रज्ञांना आला होता. दरम्यान, ऑटोमॅटिक लँडिंग प्रोग्रॅममध्ये झालेल्या गडहडीमुळे विक्रम लँडरला अपघात झाला असावा, असा अंदाज विक्रमला लँडिंगदरम्यान आलेल्या अपयशचा तपास करत असलेल्या टीमने वर्तवला आहे. 

  इस्रोमधील माहितगारांनी सांगितले की, ''1 हजार 471 किलोग्रॅम वजनाचा विक्रम लँडर आणि त्याच्यासोबत असलेला 27 किलो वजनाचा रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्टभागापासून काही अंतरावर असताना दुर्घटनाग्रस्त झाला. त्यानंतर विक्रमबाबत आतापर्यंत केलेल्या अभ्यासामधून विक्रम पुन्हा कार्यान्वित होण्याची शक्यता फारच कमी आहे.'' दरम्यान, क्रॅश लँडिंगमुळे विक्रम उलटला असावा किंवा आडवा पडला असावा, पण त्याचे ओळखू न येण्याइतपत नुकसान झाले नसावे, असा अंदाज शास्रज्ञांनी बांधला आहे. 

 छायाचित्रांचा अभ्यास करणाऱ्या एका शास्रज्ञाने सांगितले की, ''आतापर्यंत मी पाहिले आहे त्या आधारावर सांगू शकतो की, लँडर विक्रमची सावली मला दिसली. विक्रम लँडर आपल्या पायांच्या दिशेन पडला नसावा असे मी निश्चितपणे सांगू शकतो. विक्रमच्या चार पायांचे नुकसान झाले आहेत. हे पाय वाकले असावेत किंवा त्यांचे नुकसान झाले असावे.'' तर विक्रमला आलेल्या अपयशाच्या अभ्यास करणाऱ्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, ''विक्रम चंद्राच्या पृष्टभागापासून दहा किमी अंतरावर असताना अनियंत्रित झाला होता. तसेच चंद्रापासून 330 मीटरवर असताना त्याचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता.''

   दरम्यान, विक्रमच्या लँडिंग प्रोग्रॅममध्ये काहीतरी गडबड होती, असे आतापर्यंतच्या तपासानंतर वाटत आहे, असे दोन शास्रज्ञांनी सांगितले. विक्रमच लँडिंग प्रोग्रॅम यू.आर. राव. सॅटेलाइट सेंटर, बंगळुरू येथे लिहिण्यात आला होता. दरम्यान, ''लँडिंग प्रोग्रॅमचे योग्य पद्धतीने परीक्षण केले गेले होते की नाही, याची माहिती घेतली पाहिजे, असे एका शास्रज्ञाने सांगितले. सॉफ्टवेअर प्रोग्रॅमचा मुख्य उद्देश चंद्राच्या पृष्टभागावर पोहोचण्यापूर्वी 15 मिनिटांपूर्वीपर्यंतचे अंतर आणि उंचीच्या आधारावर कंट्रोल निश्चित करण्याचा होता.'' असे एका शास्रज्ञाने सांगितले. 

Web Title: Chandrayaan-2: ...Vikram lander crashed maybe due to problem in landing program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.