अपयशी झाले, तरी...; भारताने चंद्रावर जाण्यासाठी आतापर्यंत काय काय केले?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 06:03 AM2023-07-15T06:03:31+5:302023-07-15T06:04:02+5:30
लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी एकूण पाच इंजिनांचा वापर करण्यात आला होता
चंद्रयान १
१५ ऑगस्ट : तत्कालीन पंतप्रधान, दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी चंद्रयान कार्यक्रमाची घोषणा केली.
२२ ऑक्टोबर २००८ : चंद्रयान-१ ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण केले.
८ नोव्हेंबर २००८ : चंद्रयान-१ ने चंद्र स्थानांतरण मार्गात प्रवेश केला.
१४ नोव्हेंबर २००८ : चंद्रयान-१ ने चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याची पुष्टी केली.
२८ ऑगस्ट २००९ : इस्रोने चंद्रयान-१ कार्यक्रम संपल्याची घोषणा केली.
चंद्रयान २
२२ जुलै २०१९ : सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून चंद्रयान-२ प्रक्षेपित करण्यात आले.
२० ऑगस्ट २०१९ : चंद्रयान-२ अंतराळयान चंद्राच्या कक्षेत गेले.
२ सप्टेंबर २०१९ : चंद्राच्या १०० किलोमीटरच्या ध्रुवीय कक्षेत चंद्राभोवती प्रदक्षिणा घालताना विक्रम लँडर वेगळे झाले, मात्र, चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ २.१ किमी उंचीवर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. त्यामुळे मोहीम अयशस्वी ठरली.
अपयशी झाले, तरी खूप काही शिकवले
लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी एकूण पाच इंजिनांचा वापर करण्यात आला होता. या इंजिनांच्या मदतीने लँडरचा वेग कमी करण्यात येणार होता. मात्र याचवेळी लँडरची गती अपेक्षापेक्षा खूप कमी झाली. त्यामुळे सॉफ्टवेअर प्रणालीत बिघाड होऊन लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळले. तिसऱ्या मोहिमेत या चुका टाळण्यावर भर देण्यात आला आहे.
प्रमुख लक्ष्य काय?
पहिले लक्ष्य - ४० दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे सुरक्षित लॅण्डिंग करणे
दुसरे लक्ष्य - चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर फिरणे
तिसरे लक्ष्य - रोव्हरकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे चंद्राचे रहस्य उलगडणे