अभिमानास्पद! वडील चालवतात पिठाची गिरणी, आई गृहिणी; लेक चंद्रयान-3 टीमचा भाग, म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 12:55 PM2023-07-20T12:55:35+5:302023-07-20T13:04:38+5:30
सुधांशूचे वडील महेंद्र प्रसाद हे शेतकरी कुटुंबातील आहेत. ते घरी पिठाची गिरणी चालवताच, तर त्यांची आई गृहिणी आहे.
चंद्रयान -3 शुक्रवारी म्हणजेच 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. याच दरम्यान गया येथील खरखुरा येथील रहिवासी असलेले सुधांशू कुमार हेही श्रीहरिकोटा केंद्रात इस्रोचे शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. चंद्रयान 3 च्या प्रक्षेपणानंतर शास्त्रज्ञ सुधांशू कुमार यांनी सांगितले की, चंद्रयान 3 चं प्रक्षेपण हा त्यांच्या आयुष्यासाठी एक संस्मरणीय क्षण राहील. चंद्रयानच्या प्रक्षेपणाच्या दिवशी त्यांचे आई-वडील आणि बहीण त्यांना घरी टीव्हीवर पाहण्यासाठी खूप उत्सुक होते.
आपल्या मुलाला पाहून त्यांना खूप अभिमान वाटत होता. ISRO चे शास्त्रज्ञ सुधांशू कुमार यांचे प्रारंभिक शिक्षण खारखुरा मोहल्ला येथील एका सामान्य खासगी शाळेत झाले. यानंतर त्यांनी अशोक स्कूलमधून हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण केली आणि पुढील शिक्षण हरियाणामधून BTech नंतर, त्याची 2021 मध्ये ISRO साठी निवड झाली. ते शास्त्रज्ञ बनून देशाचं आणि आई-वडिलांचं नाव मोठं करत आहेत.
सुधांशूचे वडील महेंद्र प्रसाद हे शेतकरी कुटुंबातील आहेत. ते घरी पिठाची गिरणी चालवताच, तर त्यांची आई गृहिणी आहे. वडील महेंद्र प्रसाद म्हणाले, "चंद्रयान 3 च्या प्रक्षेपणात माझा मुलगा सहभागी झाला याचा मला अभिमान आहे. चंद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग व्हावे आणि माझा मुलगा आपल्या देशाला असेच नाव मिळवून देत राहो अशी आमची इच्छा आहे."
शास्त्रज्ञ सुधांशू यांनी सांगितले की, चांद्रयान 2 चे प्रक्षेपण 22 जुलै 2019 रोजी झाले. त्याचे ऑर्बिटर अजूनही कार्यरत आहे, परंतु चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश लँडिंगमुळे चांद्रयान 2 अयशस्वी झाले, परंतु यावेळी 23 ते 24 ऑगस्ट दरम्यान चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरेल अशी अपेक्षा आहे. चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणाच्या वेळी त्याचा एक भाग बनणे हा माझ्या आयुष्यासाठी एक संस्मरणीय क्षण असेल असे त्यांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.