Chandrayaan 3 Landing Live Updates: चंद्रयान ३ च्या यशानं भारतात फटाक्यांची आतषबाजी
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 05:27 PM2023-08-23T17:27:23+5:302023-08-23T20:31:32+5:30
Chandrayaan 3 Landing Live Updates : चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंगसाठी सज्ज झाले होते.
नवी दिल्ली - 'चंद्रयान ३' चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यापासून जगातील अनेक देश 'इस्रो'च्या अंतराळ मोहिमेवर लक्ष ठेवून होते. अंतराळ संशोधनाच्या इतिहासामध्ये भारतासाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा ठरला आहे. चंद्राच्या दिशेनं झेपावलेलं भारताचं चंद्रयान-३ अखेर चंद्रावर यशस्वीरित्या उतरले आहे.
LIVE
08:28 PM
चंद्रयान ३ च्या यशानंतर देशात जल्लोषाचं वातावरण
चंद्रयान ३ च्या यशानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचे वातावरण असून अनेक ठिकाणी फटाके, आतषबाजी, मंदिरात पूजा-आरती केली जात आहे.
#WATCH | Madhya Pradesh: People in Bhopal burst crackers as ISRO's third lunar mission Chandrayaan-3 made a successful landing. pic.twitter.com/KPKlU00gWl
— ANI (@ANI) August 23, 2023
08:27 PM
चंद्रयान ३ च्या यशानंतर मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात आरती
#WATCH | UP: Aarti performed at Shri Krishna Janmabhoomi Temple in Mathura on the successful landing of Chandrayan 3. pic.twitter.com/fLotTYiccx
— ANI (@ANI) August 23, 2023
08:26 PM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बनल्या ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार
#WATCH | President Droupadi Murmu witnessed the historic landing of ISRO's third lunar mission Chandrayaan-3. pic.twitter.com/CWH0wmrrXM
— ANI (@ANI) August 23, 2023
07:28 PM
चंद्रावर पोहचणारा भारत चौथा देश ठरला, त्याबद्दल अभिनंदन - NASA
"चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन आणि चंद्रावर अंतराळ यानाचे यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनल्याबद्दल भारताचे अभिनंदन. या मोहिमेत तुमचा भागीदार झाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे"- नासा संचालक बिल नेल्सन
"Congratulations ISRO on your successful Chandrayaan-3 lunar South Pole landing and congratulations to India on being the 4th country to successfully soft-land a spacecraft on the Moon. We’re glad to be your partner on this mission", tweets NASA Administrator Bill Nelson pic.twitter.com/wQVQACJN4Y
— ANI (@ANI) August 23, 2023
07:26 PM
चंद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल गायक कैलास खेरनं दिल्या शुभेच्छा
#WATCH | Mumbai: Singer Kailash Kher congratulates on the successful landing of ISRO's third lunar mission Chandrayaan-3. pic.twitter.com/pviPxyNb5R
— ANI (@ANI) August 23, 2023
07:14 PM
आम्ही आमच्या अपयशातून खूप काही शिकलो अन्...
चंद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल टीमचं अभिनंदन करताना इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार...आम्ही आमच्या अपयशातून खूप काही शिकलो आणि आज आम्ही यशस्वी झालो. आतापासून चंद्रयान-३ साठी आम्ही पुढील १४ दिवसांची वाट पाहत आहोत.
#WATCH | ISRO chief S Somanath congratulates his team on the success of the Chandrayaan-3 mission, says, "Thank you everyone for the support...We learned a lot from our failure and today we succeeded. We are looking forward to the next 14 days from now for Chandrayaan-3." pic.twitter.com/Rh0t5uHhGd
— ANI (@ANI) August 23, 2023
06:50 PM
मी लवकरच तुमचं कौतुक करण्यासाठी भारतात येईन - मोदी
दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथून चंद्रयान-३ च्या यशानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले.
#WATCH | Johannesburg, South Africa | Immediately after the success of Chandrayaan-3, PM Narendra Modi telephoned ISRO chief S Somanath and congratulated him. pic.twitter.com/NZWCuxdiXw
— ANI (@ANI) August 23, 2023
06:32 PM
भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी व्यक्त केला आनंद
#WATCH | Union Home Minister Amit Shah and BJP National President JP Nadda clap as Chandrayaan-3 successfully makes soft landing on Lunar South Pole. pic.twitter.com/8AmjKJMO4G
— ANI (@ANI) August 23, 2023
06:27 PM
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिलाच देश
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ जाणारा आपला भारत पहिला देश ठरला आहे: पी वीरामुथुवेल, चंद्रयान-३ मिशनचे प्रकल्प संचालक
#WATCH | We have become the first country to go near the South Pole of the Moon: P Veeramuthuvel, Project Director of Chandrayaan-3 Mission pic.twitter.com/7hOPFCERu8
— ANI (@ANI) August 23, 2023
06:16 PM
दिल्ली काँग्रेस मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
#WATCH | Delhi: Celebrations outside Congress headquarters as Chandrayaan-3 lands on the Moon pic.twitter.com/S4ckynMO55
— ANI (@ANI) August 23, 2023
06:15 PM
भारतासाठी अविस्मरणीय क्षण, पंतप्रधानांनी केले इस्त्रोचे कौतुक
आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि चंद्रावर तो साकारला... भारत आता चंद्रावर आहे. भारतीय संशोधकांवर देशाला गर्व आहे. भारतासाठी अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण नवी चेतना देणारा आहे. चंद्रयान महाअभिमानाचे यश भारताच्या उड्डाणाला चंद्राच्या कक्षेच्या पुढे नेणारे आहे. सौरमंडळाच्या सीमांचे सामार्थ्य यातून पडताळले जाणार आहे. आम्ही भविष्यासाठी मोठे आणि महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. लवकरच सुर्यावर भारत पोहचेल – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
#WATCH | "Humne dharti par sankalp kiya aur chand pe usse sakaar kiya...India is now on the Moon," says PM Modi. pic.twitter.com/QgZNB6MI1z
— ANI (@ANI) August 23, 2023
06:06 PM
भारत चंद्रावर पोहचला, मेहनतीला यश आलं, देशात आनंदोत्सव
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 23, 2023
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!#Chandrayaan_3#Ch3
05:58 PM
चंद्रयान ३ ने टिपली चंद्राची छायाचित्रे
चंद्रयान-३ लँडर विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे शेअर केली आहेत.
#WATCH | Chandrayaan-3 lander Vikram shares pictures of the moon's surface. pic.twitter.com/chuDCzZXUU
— ANI (@ANI) August 23, 2023
05:54 PM
विक्रम लँडर खाली उतरण्यास सुरुवात
ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (एएलएस) आणि पॉवर डिसेंट फेज सुरू झाल्यानंतर चंद्रयान-३ लँडर विक्रमची उंची कमी होत आहे. ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (एएलएस) सुरू केल्यानंतर लँडर मॉड्युलच्या खाली उतरताना कोणताही अडथळा नाही.
Chandrayaan-3 lander Vikram's altitude is decreasing after the Automatic Landing Sequence (ALS) was initiated and the power descent phase is on
— ANI (@ANI) August 23, 2023
No ground intervention in the descent of the lander module after initiation of Automatic Landing Sequence (ALS) pic.twitter.com/RnNe8tiMFT
05:49 PM
शरद पवार-सुप्रिया सुळे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे मुंबईतील नेहरू तारांगण येथे चंद्रयान-३ लँडिंग कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपणासाठी हजर
#WATCH | NCP chief Sharad Pawar & Supriya Sule watch live telecast of Chandrayaan-3 landing event at Nehru Planetarium in Mumbai pic.twitter.com/IAqNU3TlYU
— ANI (@ANI) August 23, 2023
05:47 PM
चंद्रयान ३ लँडिंग प्रक्रियेला सुरूवात
चंद्रयान-३ लँडर विक्रमचा पॉवर डिसेंट टप्पा सुरू झाला आहे असे इस्रोने म्हटले आहे
The power descent phase of Chandrayaan-3 lander Vikram has started, says ISRO. pic.twitter.com/mr5SVn6htw
— ANI (@ANI) August 23, 2023
05:43 PM
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये हजर
चंद्रावर चंद्रयान-३ मिशन सॉफ्ट लँडिंगसाठी बेंगळुरू येथील मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ हजर
#WATCH | ISRO Chairman S Somanath at Mission Control Complex in Bengaluru for Chandrayaan-3 Mission soft landing on the Moon pic.twitter.com/9k4ZyySwd1
— ANI (@ANI) August 23, 2023
05:41 PM
चंद्रयान ३ च्या यशासाठी मुस्लिम बांधवांची नमाज
चंद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी श्रीनगरमधील मशिदीत मुस्लीम बांधवांची विशेष नमाज
#WATCH | J&K | People offer special prayers at a mosque in Srinagar for the successful lunar landing of Chandrayaan-3. pic.twitter.com/UohZQSpuGo
— ANI (@ANI) August 23, 2023
05:38 PM
कसा झाला चंद्रयान ३ चा प्रवास, इस्त्रोने सांगितले.
चंद्रयान-३ चे प्रक्षेपण आणि लँडिंग दरम्यानच्या प्रवासाचे वर्णन करताना इस्रोने सांगितले की, लँडर मॉड्यूलने २१ वेळा पृथ्वी आणि १२० वेळा चंद्राची प्रदक्षिणा केली आहे.
05:35 PM
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी केंद्रीय मंत्री हजर
चंद्रावर विक्रम लँडरचे लँडिंग पाहण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह दिल्लीतील CSIR मुख्यालयात उपस्थित आहेत.
#WATCH चंद्रमा पर विक्रम लैंडर की लैंडिंग देखने के लिए दिल्ली में CSIR मुख्यालय में केंद्रीय विज्ञान एवं प्रौद्योगिकी राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह मौजूद हैं।#Chandrayaan3pic.twitter.com/CwsqtQkp1q
— ANI_HindiNews (@AHindinews) August 23, 2023
05:34 PM
इस्त्रोच्या मिशन कंट्रोल टीममध्ये सर्व सज्ज
बेंगळुरूमधील इस्रोच्या मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समधून चंद्रयान ३ मिशनच्या लँडिंगसाठी सज्ज
#WATCH बेंगलुरु में इसरो के मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्स से चंद्रयान 3 मिशन की लैंडिंग इवेंट के दृश्य। pic.twitter.com/n5oSSvjasK
— ANI_HindiNews (@AHindinews) August 23, 2023
05:30 PM
'चंद्रयान-३'च्या ऑटोमॅटिंक लँडिंग सिक्वेन्ससाठी इस्रो सज्ज
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 23, 2023
All set to initiate the Automatic Landing Sequence (ALS).
Awaiting the arrival of Lander Module (LM) at the designated point, around 17:44 Hrs. IST.
Upon receiving the ALS command, the LM activates the throttleable engines for powered descent.
The… pic.twitter.com/x59DskcKUV
05:29 PM
ऐतिहासिक क्षणाचे लाईव्ह कव्हरेज, पाहा युट्यूबवर LIVE
संध्याकाळी ६.०४ चा मुहूर्त... विक्रम लँडर चंद्रावर उतरणार, प्रग्यान रोव्हर बाहेर पडणार!... 'इस्रो'च्या यू-ट्युब चॅनलवर चंद्रयान-३ चं लाइव्ह कव्हरेज