चंद्रावर पहिलं कोण पोहोचणार? भारताचं चंद्रयान-३ की रशियाचं मून मिशन लुना-२५
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 09:23 AM2023-08-08T09:23:47+5:302023-08-08T09:24:28+5:30
भारताने चंद्रयान ३ १४ जुलै रोजी लाँच केले. आता रशियाही आपले मून मिशन लूना-२५ ११ ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे.
भारताने चंद्रयान 3 १४ जुलै रोजी लाँच केले. काही दिवसातच चंद्रयान चंद्रयावर लँड करणार आहे, आता ५० वर्षानंतर रशिया ११ ऑगस्ट रोजी चंद्र मोहीम सुरू करण्याची आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणारा पहिला देश बनण्याच्या शर्यतीत सामील होण्याची योजना आखत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा संभाव्य स्त्रोत शोधण्याची शास्त्रज्ञांना फार पूर्वीपासून आशा होती. भविष्यात मानवाला तिथे राहण्यासाठी आवश्यक आहे. या दिशेने संशोधनासाठी भारताने १४ जुलै रोजी प्रक्षेपित केलेल्या चंद्रयान-3 सोबत पुढे सरसावले आहे.
पृथ्वीवरून लँडरच्या स्थितीचा अंदाज लावण्यात अडचण; चंद्रयानासाठी पुढचा टप्पा अत्यंत कठीण : इस्रो
काल भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने म्हटले आहे की, ते २३ ऑगस्टच्या सुमारास चंद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग करण्याची योजना आखत आहेत. रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने सांगितले की, त्यांच्या Luna-25 यानाला चंद्रावर जाण्यासाठी पाच दिवस लागतील. Luna-25 नंतर त्याच्या दक्षिण ध्रुवाजवळील तीन संभाव्य लँडिंग साइट्सपैकी एकावर उतरण्यापूर्वी चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ५-७ दिवस घालवेल. भारताचे चंद्रयान 3 आणि रशियाचे यान सोबतच लँड करु शकते.
खडबडीत भूभागामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे कठीण होते. दक्षिण ध्रुव हे एक मौल्यवान ठिकाण आहे या ठिकाणी भरपूर बर्फ असू शकतो, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. ज्याचा वापर इंधन आणि ऑक्सिजन तसेच पिण्याचे पाणी काढण्यासाठी केला जाऊ शकतो. रशियाच्या रोसकॉसमॉसने सांगितले की, दोन मोहिमा एकमेकांच्या आड येणार नाहीत कारण त्यांनी वेगवेगळ्या भागात उतरण्याचे नियोजन केले आहे. रोसकॉसमॉसने एका निवेदनात म्हटले आहे की, 'दोन अंतराळयान एकमेकांच्या मार्गात येतील किंवा आदळतील असा कोणताही धोका नाही. चंद्रावर प्रत्येकासाठी पुरेशी जागा आहे.
चंद्रयान-3 हे दोन आठवडे प्रयोग चालवण्यासाठी डिझाइन केले आहे, तर लुना-25 चंद्रावर वर्षभर काम करेल. १.८ टन वजन आणि ३१ किलोग्रॅम वैज्ञानिक उपकरणे घेऊन, Luna-25 १५ सेमीने गोठलेल्या पाण्याच्या उपस्थितीची चाचणी घेणार. ६ इंच खोलीतून खडकाचे नमुने घेण्यासाठी स्कूप वापरेल. ज्यामुळे चंद्रावर मानवी जीवन शक्य होऊ शकते. ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रक्षेपित होणार्या लुना-25 मोहिमेला जवळपास दोन वर्षे विलंब झाला आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने त्यांचा पायलट-डी नेव्हिगेशन कॅमेरा लुना-25 ला जोडून त्याची चाचणी घेण्याची योजना आखली होती. मात्र गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर याचे काम लांबणीवर पडले.