ISRO ची महत्वपूर्ण मोहीम; 'या' तारखेला लॉन्च होणार चंद्रयान-3, इंजिनमध्ये केला मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 07:53 PM2023-06-28T19:53:33+5:302023-06-28T19:54:23+5:30

इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी बहुप्रतिक्षित चंद्रयान-3 च्या प्रक्षेपणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

chandrayaan-3-launch-between-july-12-to-july-19-2023-isro-chief-s-somnath-said | ISRO ची महत्वपूर्ण मोहीम; 'या' तारखेला लॉन्च होणार चंद्रयान-3, इंजिनमध्ये केला मोठा बदल

ISRO ची महत्वपूर्ण मोहीम; 'या' तारखेला लॉन्च होणार चंद्रयान-3, इंजिनमध्ये केला मोठा बदल

googlenewsNext

Chandrayaan-3 :भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ यांनी बहुप्रतिक्षित चंद्रयान-3 च्या प्रक्षेपणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना सोमनाथ म्हणाले की, 12 ते 19 जुलै दरम्यान चंद्रयान-3 चे प्रक्षेपण केले जाईल. सर्व चाचण्या झाल्या असून, लॉन्चिंगची तारीख येत्या काही दिवसांत जाहीर केली जाईल.

चंद्रयान-3 चे प्रक्षेपण GSLV-MK-3 रॉकेटमधून होणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होईल. गेल्या वेळी चंद्रयान-2 च्या विक्रम लँडरचे काय झाले, याची माहिती इस्रो प्रमुखांनी यापूर्वीच दिली आहे. यावेळी तसा अपघात होणार नाही, अशी काळजीही घेत असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रोने यावेळी चंद्रयान-3 च्या लँडरचे लँडिंग तंत्र बदलले आहे. त्यामुळे चंद्रयान-2 च्या चुका चंद्रयान-3 मध्ये होणार नाहीत. 

चंद्रयान-3 मिशनमध्ये इस्रो फक्त लँडर आणि रोव्हर पाठवत आहे. लँडर-रोव्हरचा संपर्क चंद्राभोवती फिरणाऱ्या चंद्रयान-2 च्या ऑर्बिटरशी जोडला जाईल. या अंतराळयानाचे बहुतांश प्रोग्राम ऑटोमॅटिक आहेत. यात शेकडो सेन्सर बसवण्यात आले आहेत, जे त्याच्या लँडिंग आणि इतर कामांमध्ये मदत करतील.

7 किमीपासून लँडिंग सुरू होईल

हे सेन्सर्स लँडरच्या लँडिंगवेळी उंची, लँडिंगचे ठिकाण, वेग आणि चंद्रावरील दगडांपासून लँडरचा बचाव करेल. चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर 7 किलोमीटर उंचीवरुन उतरण्यास सुरुवात करेल आणि 2 किमी उंचीवर पोहोचताच सेन्सर्स सुरू होतील. त्यानुसार लँडर त्याची दिशा, वेग आणि उतरण्याची जागा ठरवेल. यावेळी इस्रोच्या शास्त्रज्ञांना लँडिंगबाबत कोणतीही चूक करायची नाही. कारण चांद्रयान-2 चे सेन्सर्स आणि बूस्टरमध्ये अडचणींमुळेच हार्ड लँडिंग झाले होते. चंद्रयान-2 पृष्ठभागापासून सुमारे 350 मीटर उंचीवरुन वेगाने फिरत असताना जमिनीवर कोसळले होते. 

चंद्रयान-3 चे इंजिन बदलले
चंद्रयान-2 च्या लँडरप्रमाणेच चंद्रयान-3 च्या लँडरमध्ये पाचऐवजी चार थ्रॉटल इंजिन असतील. चंद्रयान-2 च्या विक्रम लँडरमध्ये पाच थ्रॉटल इंजिन होते. त्यातील एक बिघडल्यामुळे लँडिंग खराब झाली. यावेळी चंद्रयान-3 च्या लँडरमध्ये लेझर डॉपलर व्हेलोसिमीटर (LDV) बसवल्याचीही बातमी आहे. यामुळे लँडिंग खूप सोपी होईल.

Web Title: chandrayaan-3-launch-between-july-12-to-july-19-2023-isro-chief-s-somnath-said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.