चंद्रयान-2 च्या अपयशाने ISRO प्रमुख भावूक, पीएम मोदींनी दिला होता धीर; तो Video व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 02:27 PM2023-07-14T14:27:00+5:302023-07-14T14:51:13+5:30
Chandrayaan-3 Moon Mission Launch : 2019 मध्ये चंद्रयान-2 च्या अपयशामुळे ISRO प्रमुख भावूक झाले होते, तेव्हा PM मोदींनी मिठी मारुन त्यांना धीर दिला होता.
Chandrayaan-3 Moon Mission Launch: आज भारताताचे महत्वकांशी मिशन चंद्रयान-3 चे प्रक्षेपण होणार आहे. यादरम्यान, चंद्रयान-2 च्या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 7 सप्टेंबर 2019 रोजी संपूर्ण देश चंद्रयान-2 चंद्रावर यशस्वीपणे उतरण्याची वाट पाहत होता. इस्रोच्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान स्वतः हरिकोटा येथे पोहोचले होते. सर्व काही ठीक सुरू होते, पण शेवटच्या काही क्षणात ISRO चा चंद्रयानाशी संपर्क तुटला. यानंतर इस्रो प्रमुखांनी चंद्रयान 2 अयशस्वी झाल्याची घोषणा केली. यानंतर पीएम मोदी तिथून निघत असताना, इस्रो प्रमुख पंतप्रधानांना मिठी मारुन खूप रडले होते.
चंद्रयान-2 च्या अपयशाने के सिवन भावूक
इस्रोचा चंद्रयान-2 शी संपर्क तुटल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसह देशातील जनतेचीही निराशा झाली. यानंतर पंतप्रधानांनी तिथे उपस्थित सर्व शास्त्रज्ञांना धीर दिला आणि तेथून निघत होते. यावेळी पंतप्रधान मोदींना बाहेरपर्यंत सोडायला आलेले के सिवन भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून पंतप्रधान मोदींनी त्यांना मिठी मारली. यानंतर सिवन खूप रडले.
तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल
आता आज चंद्रयान-3 च्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे. भारताचे मिशन यशस्वी होण्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. यादरम्यान, 2019 चा पंतप्रधान मोदी आणि के सिवन यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चंद्रयान 2 शी संपर्क तुटल्यानंतर पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांना कसे प्रोत्साहन दिले होते, हेदेखील त्या व्हिडिओत दाखवले आहे.
काय म्हणाले होते मोदी?
चंद्रयान 2 च्या अपयशानंतर पीएम मोदी शास्त्रज्ञांना म्हणाले, “यानाशी संपर्क तुटल्यामुळे तुमचे चेहरे दुखी दिसत आहेत, पण तुम्ही लोकांनी जे केले, ती काही गोष्ट नाही. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. फक्त मलाच नाही, तर संपूर्ण देशाला तुमच्या प्रयत्नांचा अभिमान आहे. मी आणि संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे."