'...तर चंद्रयान-3 चे लँडर-रोव्हर नष्ट होईल; इस्रोच्या प्रमुखांनी भीती केली व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 01:12 PM2023-08-25T13:12:58+5:302023-08-25T13:14:53+5:30
भारताच्या चंद्रयान 3 ने बुधवारी यशस्वी लँडिंग केले.
भारताच्या चंद्रयान 3 ने चंदाच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणार जगातील भारत देश हा पहिलाच आहे. तर चंद्रावर जाणार चौथा देश आहे, आता इथून पुढे काही दिवस इस्त्रोसाठी महत्वाचे आहेत. या संदर्भात आता इस्त्रोचे प्रमुखांनी मोठी अपडेट दिली आहे.
'एक सच्चा पाकिस्तानी असल्याने..'; Chandrayaan 3च्या यशावर पाकिस्तानी अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी गुरुवारी सांगितले की, चंद्रयान-3 चे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान हे दोन्ही चांगले काम करत आहेत आणि यापुढेही हालचाली होतील. मात्र, या चंद्र मोहिमेतील आव्हानांबाबतही त्यांनी इशारा दिला आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना इस्रो प्रमुख म्हणाले, "चंद्रयान-3 चे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रग्यान दोघेही पूर्णपणे ठीक आहेत आणि सर्व काही चांगले काम करत आहे. मात्र वातावरण सध्या नाही. अशा परिस्थितीत कोणतीही वस्तू चंद्रयान-3 ला धडकू शकते. म्हणजेच टक्कर होऊ शकते. याशिवाय थर्मल प्रॉब्लेम आणि कम्युनिकेशन ब्लॅकआउटची समस्याही येऊ शकते.
"एखादा लघुग्रह किंवा इतर कोणतीही वस्तू चंद्रयान-3 शी खूप वेगाने आदळली, तर लँडर आणि रोव्हर दोन्ही नष्ट होतील. चंद्राच्या पृष्ठभागावर बारकाईने पाहिल्यास, पृष्ठभाग अंतराळावर अनेक खुणाने झाकलेले आहे." पृथ्वीवरही दर तासाला लाखो अंतराळ पिंड येतात, पण आपल्याला कळत नाही. कारण पृथ्वीवर वातावरण आहे आणि आपले वातावरण त्या सर्वांना नष्ट करते." चंद्रयान-3 च्या विक्रम लँडरने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.४ वाजता दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले.
इस्रोच्या दिलेल्या माहितीनुसार, रोव्हर प्रज्ञान लँडरवरून खाली उतरले आहे आणि चंद्राच्या पृष्ठभागाला प्रदक्षिणा घालत आहे. चंद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग संदर्भात बोलताना इस्रो प्रमुख म्हणाले, "हे फक्त इस्रोसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी आहे. इतर प्रत्येक भारतीयाप्रमाणेच आम्हालाही अभिमान आहे की यावेळी आमचे लँडिंग यशस्वी झाले. आम्ही इतक्या वर्षांच्या मेहनतीमुळे. आम्ही आणखी आव्हानात्मक मोहिमा करण्यासाठी उत्सुक आहोत. अधिक कठोर परिश्रमाचे फळ देतात, असंही ते म्हणाले.
VIDEO | "Chandrayaan-3 landed well within the area identified for the landing," says @isro chairman Somanath Chandrayaan-3's successful landing on the Moon on August 23.#Chandrayaan3pic.twitter.com/soYvrWlZYP
— Press Trust of India (@PTI_News) August 24, 2023