चंद्रयान चंद्राच्या चौथ्या कक्षेत पोहोचलं...; जाणून घ्या, आता कसा असेल पुढचा प्रवास?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 03:37 PM2023-08-14T15:37:54+5:302023-08-14T15:38:55+5:30
Chandrayaan-3 Fourth Moon Orbit Maneuver: 5 ऑगस्टला चंद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले होते.
ISRO ने Chandrayaan-3 चंद्राच्या चौथ्या कक्षेत पाठवले आहे. आता चंद्रयान 150 km x 177 km असलेल्या साधारणपणे गोलाकार कक्षेत फिरत आहे. इस्रोने 14 ऑगस्टच्या सकाळी साधारणपणे पाउने बारा वाजता चंद्रयान-3 चे थ्रस्टर्स ऑन केले होते. इंजिन जवळपास 18 मिनिटे ऑन केले होते. 5 ऑगस्टला चंद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले होते.
चंद्रयान पहिल्या कक्षेत पोहोचल्यानंतर, त्याची कक्षा दोनवेळा बदलण्यात आली. याच दिवशी चांद्रयानाने चंद्राचे पहिले छायाचित्र पाठवले होते. त्यावेळी चांद्रयान चंद्राभोवती 164 x 18074 KM च्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किमी प्रति सेकंद वेगाने फिरत होते. यानंतर, आता 16 ऑगस्टच्या सकाळी 8:38 ते 8:39 वाजताच्या सुमारास चंद्रयानाची पाचवी कक्षा बदलली जाईल. म्हणजेच केवळ एका मिनिटासाठी याचे इंजिन ऑन केले जाईल.
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 14, 2023
Orbit circularisation phase commences
Precise maneuvre performed today has achieved a near-circular orbit of 150 km x 177 km
The next operation is planned for August 16, 2023, around 0830 Hrs. IST pic.twitter.com/LlU6oCcOOb
तसेच, 17 ऑगस्टला चंद्रयान-3 चे प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. याच दिवशी दोन्ही मॉड्यूल चंद्राच्या चारही बाजूंना 100 km x 100 km गोलाकार ऑर्बिटमध्ये असतील. 18 ऑगस्टला दुपारी पाऊणे चार ते चार वाजताच्या सुमारास लँडर मॉड्यूलचे डीऑर्बिटिंग होईल. अर्थात त्याचा कक्षेतील उंची कमी केली जाईल.
20 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलचे रात्री पाउणए दोन वाजता डीऑर्बिटिंग होईल. 23 ऑगस्ट रोजी लँडर चंद्रच्या दक्षिण ध्रुवावर लँड करेल. सर्वकाही ठीक असल्यास, पाउणे सहा वाजताच्या सुमारास लँडर चांद्राच्या पृष्ठ भागावर उतरेल.