चांद्रयान-३ चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज; PM मोदीही दक्षिण अफ्रिकेतून कार्यक्रमात सामील होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 10:10 PM2023-08-22T22:10:49+5:302023-08-22T22:15:02+5:30

१५व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दक्षिण आफ्रिकेत आहेत.

Chandrayaan-3 ready to land on lunar surface; PM Narendra Modi will also join the program from South Africa | चांद्रयान-३ चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज; PM मोदीही दक्षिण अफ्रिकेतून कार्यक्रमात सामील होणार

चांद्रयान-३ चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज; PM मोदीही दक्षिण अफ्रिकेतून कार्यक्रमात सामील होणार

googlenewsNext

नवी दिल्ली: चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी उतरणार आहे. चांद्रयान-३ च्या विक्रम लँडर कॅमऱ्याद्वारे लँडिंगसाठी सुरक्षित जागा शोधत आहे. आता अवघ्या जगाच्या नजरा भारताच्या चंद्र मोहिमेकडे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जेव्हा चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, त्यावेळी इस्त्रोसोबत व्हिडिओद्वारे संपर्कात असणार आहेत. २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या १५व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दक्षिण आफ्रिकेत आहेत.

रशियाच्या लुना २५ चा अपघात आणि मागील चंद्रयान २ चे अपयश पाहता यंदा इस्त्रोने मोठी काळजी घेतली आहे. विक्रम लँडरच्या वरच्या आणि मागच्या बाजूस अँटिना जोडण्यात आलेत. त्यामुळे लँडिंग मॉड्युलचे प्रत्येक क्षणाचे आणि स्थितीचे अपडेट इस्त्रोला मिळतील. चंद्रयान ३ च्या लँडिंगच्या २ तासआधी आढावा घेतला जाईल. जर लँडिंगसाठी वातावारण पोषक नसेल तर लँडिग २७ ऑगस्टपर्यंत लांबणीवर जाऊ शकते अशी माहिती इस्त्रोच्या स्पेस एप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी दिली आहे.

तसेच चंद्राच्या पृष्ठभागावरील स्थिती पाहून चंद्रावर उतरायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. २३ ऑगस्टलाच आम्ही चंद्रावर उतरण्यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु जर काही विपरीत स्थिती असेल तर लँडिंग २७ ऑगस्टला केले जाईल. त्यासाठीही आम्ही काळजी घेतली आहे. यासाठी जे काही प्रक्रिया करायची ती आम्ही पूर्ण केली आहे असंही देसाई यांनी म्हटलं.

आधी झालेली चूक पुन्हा होणार नाही....

मागील चंद्रयान २ वेळी आम्ही चांगले काम केले होते. परंतु आम्हाला यश मिळाले नाही. फक्त लँडिंग प्रक्रियेत आम्ही पोहचलो नव्हतो. परंतु यावेळेस आम्ही चांगली तयारी केली आहे. सध्या आमच्यासाठी उत्सुकता आहे. आम्ही सगळेच सज्ज आहोत. यावेळी आम्हाला नक्की यश मिळणारच आहे. चंद्रयान २ मध्ये जी चूक झाली ती चंद्रयान ३ मध्ये होणार नाही हे नक्की अशी माहिती इस्त्रोचे माजी प्रमुख डॉ. के सिवन यांनी दिली.

Web Title: Chandrayaan-3 ready to land on lunar surface; PM Narendra Modi will also join the program from South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.