'नासा'चे यान चंद्रावर 4 दिवसांत पोहोचते, 'इस्त्रो'ला 42 दिवस का? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 04:06 PM2023-07-17T16:06:04+5:302023-07-17T16:07:36+5:30

Chandrayaan 3: इस्त्रो अंतराळयान थेट चंद्रावर पाठवत नसण्यामागेही हेच कारण आहे

Chandrayaan 3 running in orbit of earth before being launched to moon why this Isro reveals reason | 'नासा'चे यान चंद्रावर 4 दिवसांत पोहोचते, 'इस्त्रो'ला 42 दिवस का? जाणून घ्या कारण

'नासा'चे यान चंद्रावर 4 दिवसांत पोहोचते, 'इस्त्रो'ला 42 दिवस का? जाणून घ्या कारण

googlenewsNext

Chandrayaan 3: पृथ्वीवरील लोकांना चंद्र समोर दिसतो. पण त्याचे पृथ्वीपासून अंतर 3.83 लाख किलोमीटर आहे. खरे पाहता हे अंतर अवघ्या चार दिवसांत किंवा जास्तीत जास्त एका आठवड्यात पूर्ण होऊ शकते. पण कोणतेही अंतराळ यान थेट ग्रहावर पाठवले जात नाही? पृथ्वीभोवती फिरणे झाल्यानंतरच ते पुढे पाठवले जाते. असे का? नासा चार दिवस ते एका आठवड्यात चंद्रावर आपले वाहन पोहोचवते. इस्रो हे का करत नाही? इस्रोला चार दिवसांऐवजी 40-42 दिवस का लागतात. यामागे काही विशिष्ट कारण आहे का? असे विचारले जाते. याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत.

पहिले कारण- प्रकल्पाची किंमत

सर्वप्रथम, पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून अंतराळयान खोल अवकाशात पाठवण्याची प्रक्रिया स्वस्त आहे. इस्रो थेट चंद्रावर आपले वाहन पाठवू शकत नाही असे नाही. पण इस्रोचे प्रकल्प नासाच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या स्वस्त आहेत आणि उद्देशही पूर्ण होतो. इस्रोकडे नासासारखे मोठे आणि शक्तिशाली रॉकेट नाहीत, जे चांद्रयानला थेट चंद्राच्या कक्षेत ठेवू शकते. अशी रॉकेट बनवण्यासाठी हजारो कोटी रुपये लागतील.

2010 मध्ये चीनने चांगई-2 चंद्रावर पाठवला. चार दिवसांत तो चंद्रावर पोहोचला. चांगई-3 लाही चार दिवस लागले. सोव्हिएत युनियनची पहिली चंद्र मोहीम लुना-१ अवघ्या ३६ तासांत चंद्राजवळ पोहोचली. अमेरिकेचे अपोलो-11 कमांड मॉड्युल कोलंबिया देखील तीन अंतराळवीरांसह चार दिवसांत पोहोचले. या अवकाशयानांसाठी चीन, अमेरिका आणि सोव्हिएत युनियनने मोठ्या रॉकेटचा वापर केला होता. चीनने चांग झेंग 3C रॉकेटचा वापर केला. या मिशनसाठी 1026 कोटी रुपये खर्च आला होता. SpaceX च्या Falcon-9 रॉकेटची प्रक्षेपण किंमत 550 कोटी ते 1000 कोटींपर्यंत आहे. मात्र इस्रोच्या रॉकेटची प्रक्षेपण किंमत 150 ते 450 कोटी इतकी आहे. त्यामुळे भारताचे यान पोहोचायला वेळ लागतो.

दुसरे कारण- पृथ्वीचा वेग आणि गुरुत्वाकर्षणाचा फायदा

रॉकेटला दूर अंतराळात पाठवायचे असेल तर त्याला पृथ्वीचा वेग आणि गुरुत्वाकर्षणाचा फायदा मिळतो. जेव्हा चालत्या बसमधून किंवा स्लो ट्रेनमधून उतरता, तेव्हा तुम्ही त्यांच्या गतीच्या दिशेने उतरता. असे केल्याने, तुम्ही घसरण्याची शक्यता 50 टक्क्यांनी कमी होते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही रॉकेट थेट अंतराळाच्या दिशेने पाठवले तर पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती तुम्हाला अधिक वेगाने खेचते. अशा परिस्थितीत रॉकेट किंवा अंतराळयान पृथ्वीवर पडण्याचा धोका कमी होतो. यान पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते आणि कक्षेत फिरते. त्यामुळे चांद्रयान-३ ला चंद्रावर पोहोचण्यासाठी ४२ दिवसांचा कालावधी लागणार आहे. कारण चांद्रयान-३ ला पृथ्वीभोवती पाच फेऱ्या करायच्या आहेत. त्यानंतर लांब पल्ल्याच्या चंद्र संक्रमण कक्षेमध्ये प्रवास करावा लागेल. यानंतर तो चंद्राभोवतीची कक्षा बदलेल. इस्रोने आतापर्यंत दोनदा चांद्रयान-३ ची कक्षा बदलली आहे.

Web Title: Chandrayaan 3 running in orbit of earth before being launched to moon why this Isro reveals reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.