चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत दाखल, 'इस्रो'ला आता दोन टप्प्यांची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 10:29 PM2023-08-05T22:29:39+5:302023-08-05T22:30:08+5:30

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान-३ यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे. यासंदर्भात इस्रोने ट्विट करून माहिती दिली आहे. 

Chandrayaan-3 successfully enters Moon orbit: ISRO | चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत दाखल, 'इस्रो'ला आता दोन टप्प्यांची प्रतीक्षा

चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत दाखल, 'इस्रो'ला आता दोन टप्प्यांची प्रतीक्षा

googlenewsNext

श्रीहरीकोटा : भारताचे चांद्रयान-३ शनिवारी चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या दाखल झाले आहे. २२ दिवसांच्या प्रवासानंतर आज संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेतील हा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा होता. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान-३ यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे. यासंदर्भात इस्रोने ट्विट करून माहिती दिली आहे. 

इस्रोने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या दाखल झाले आहे. मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX), ISTRAC (ISRO टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क), बंगळुरू येथून पेरीलूनमध्ये (Perilune) येथे रेट्रो-बर्निंगची कमांड देण्यात आली होती. पेरीलून हे अंतराळयानाचे चंद्राच्या सर्वात जवळचे ठिकाण आहे. याचबरोबर, चांद्रयान-३ चे आता पुढील ऑपरेशन कक्षा कमी करण्याचे असेल. हे उद्या रात्री (6 ऑगस्ट) केले जाईल, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.

इस्रोने पाठवलेले चांद्रयान-३ हे ४२ दिवसांचा प्रवास करून चंद्रावर पोहोचणार आहे. यासाठी आता चांद्रयाना -३ चे पुढील दोन टप्पे महत्त्वाचे असणार आहेत. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १७ ऑगस्टला विक्रम लँडर वेगळे होईल आणि  २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चे लँडिंग केले जाऊ शकते. लँडिंग यशस्वी झाल्यानंतर रोव्हर प्रयोगासाठी लँडरमधून बाहेर येईल आणि पुढील ३ ते ६ महिन्याच्या काळात विविध प्रयोग करेल.

इस्रोची ही मोहिम यशस्वी झाली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर जाणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. दरम्यान, चांद्रयान-२ मोहिमेत इस्रोला सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आले होते. तेव्हा ७ सप्टेंबर २०२९ रोजी विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंगच्या वेळी ब्रेकिंग प्रणालीत झालेल्या गडबडीमुळे चंद्राच्या भूमीवर क्रॅश झाले होते. इस्रोने २००८ साली चांद्रयान-१ मोहिम सुरु केली होती. गेल्या १५ वर्षातील भारताची ही तिसरी चंद्र मोहिम आहे.
 

Web Title: Chandrayaan-3 successfully enters Moon orbit: ISRO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.