भारताच्या चंद्रयान-3 चे खरे ‘हिरो’, यांच्याच मेहनतीमुळे भारताने रचला इतिहास; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 06:39 PM2023-08-23T18:39:23+5:302023-08-23T18:41:06+5:30

Chandrayaan-3 Team: भारताने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे.

Chandrayaan 3 Team: 'Heroes' of India's Chandrayaan-3, India made history due to their hard work | भारताच्या चंद्रयान-3 चे खरे ‘हिरो’, यांच्याच मेहनतीमुळे भारताने रचला इतिहास; जाणून घ्या...

भारताच्या चंद्रयान-3 चे खरे ‘हिरो’, यांच्याच मेहनतीमुळे भारताने रचला इतिहास; जाणून घ्या...

googlenewsNext

Chandrayaan 3 Team: आज भारतासाठी ऐतिहासिक क्षण आहे. इस्रोची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम यशस्वी झाली आहे. चंद्रयान-3 चे "विक्रम" हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरले आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. वर्षानुवर्षे या मोहिमेवर काम करणारी इस्रोची टीम या मिशनमागे आहे.

इस्रोची तिसरी चंद्र मोहीम मागील दोन मोहिमांपेक्षा खूपच वेगळी आहे. इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमने मिशनला अशा टप्प्यावर नेले की संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे होते. चंद्रयान-3 च्या तयारीसाठी 3 वर्षे, 9 महिने आणि 14 दिवस लागले. यामागे दिग्गजांची टीम आहे, ज्यांच्यामुळे भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जाणून घ्या, या मिशनमागे कोण आहेत.

डॉ. एस. सोमनाथ: चंद्रयान-3 च्या रॉकेटची रचना
डॉ. एस. सोमनाथ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष असण्यासोबतच या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या मोहिमेतील रॉकेटच्या लॉन्च व्हीकल तयार केले आहे. याच्याच मदतीने चंद्रयान-3 चे प्रक्षेपण झाले. भारताची ही तिसरी चंद्र मोहीम आहे. बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिकलेल्या डॉ. एस. सोमनाथ यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये या मिशनची जबाबदारी मिळाली होती. इस्रोच्या आधी डॉ. सोमनाथ हे विक्रम साराभाई स्पेस सेंटर आणि फ्लोटिंग प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे संचालकही राहिले आहेत. चंद्रयान-3 नंतर दोन मोठ्या मोहिमांची कमान डॉ. एस. सोमनाथ यांच्या हाती असेल. यामध्ये आदित्य-L1 आणि गगनयानचा समावेश आहे.

पी वीरामुथुवेल: चंद्रावरील अनेक शोधांसाठी ओळखले जातात
पी वीरमुथुवेल हे प्रोजेक्टर डायरेक्टर म्हणून मिशनचे नेतृत्व करत आहेत. त्यांना 2019 मध्ये मिशन चंद्रयानची जबाबदारी देण्यात आली होती. पी वीरमुथुवेल हे यापूर्वी इस्रोच्या मुख्य कार्यालयातील अंतराळ पायाभूत सुविधा कार्यक्रम कार्यालयात उपसंचालक होते. इस्रोच्या दुसऱ्या चंद्र मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तामिळनाडूतील विल्लुपुरम येथे राहणारे पी वीरामुथुवेल यांनी आयआयटी मद्रासमधून पदवी प्राप्त केली आहे. चंद्रावर चंद्रयान 2 फ्लॉट्सम आणि जेट्सम शोधण्यासाठी देखील त्यांची ख्याती होती. 

एस उन्नीकृष्णन नायर: रॉकेट बांधण्याची जबाबदारी 
विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक आणि एरोस्पेस अभियंता डॉ. उन्नीकृष्णन यांच्याकडे चंद्रयान-3 शी संबंधित अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. या मोहिमेसाठी, रॉकेटच्या विकासाची आणि बांधकामाची जबाबदारी त्यांच्याकडे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) मार्क-III केरळमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये तयार करण्यात आले.

एम शंकरन: इस्रोचे उपग्रह डिझाइन आणि तयार करण्याची जबाबदारी
एम शंकरन हे UR राव उपग्रह केंद्राचे (URSC) संचालक आहेत. या संस्थेकडे इस्रोचे उपग्रह तयार करण्याची आणि डिझाइन करण्याची जबाबदारी आहे. शंकरन यांच्या नेतृत्वाखाली ही टीम सॅटेलाइट कम्युनिकेशन, नेव्हिगेशन, रिमोट वर्किंग, हवामान अंदाज आणि ग्रहांचा शोधाचे काम करते. एम शंकरन यांनी 1986 मध्ये तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. यानंतर ते इस्रोच्या उपग्रह केंद्रात रुजू झाले. 

मोहना कुमार: मिशन डायरेक्टर
एस मोहन्ना कुमार हे LVM3-M4/चंद्रयान-3 चे मिशन डायरेक्टर आहेत आणि ते विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. एस मोहन्ना हे यापूर्वी LVM3-M3 मिशनवर वन वेब इंडिया 2 उपग्रहांच्या व्यावसायिक प्रक्षेपणाचे संचालक होते. एस मोहन्ना कुमार म्हणाले, "LVM3-M4 पुन्हा एकदा इस्रोसाठी सर्वात विश्वासार्ह हेवी लिफ्ट वाहन असल्याचे सिद्ध झाले आहे. इस्रो परिवाराच्या टीमवर्कसाठी अभिनंदन."

ए राजराजन: लाँच ऑथोरायझेशन बोर्डाचे प्रमुख
ए राजराजन हे सतीश धवन स्पेस सेंटर SHAR (SDSC SHAR) चे संचालक आहेत, जे श्रीहरिकोटा येथे आहे, हे भारताचे प्रमुख अंतराळ पोर्ट आहे. SDSC SHAR चे संचालक असल्याने, ते इस्रो प्रक्षेपण आणि मानवी अंतराळ कार्यक्रम (गगनयान) आणि SSLV च्या प्रक्षेपणांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रक्षेपणाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे प्रमुख होते.

Web Title: Chandrayaan 3 Team: 'Heroes' of India's Chandrayaan-3, India made history due to their hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.