चंद्रयान ३ आता चंद्रापासून काहीच अंतरावर; भारतासह जगाचं लक्ष, सध्या काय चाललंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 06:12 PM2023-08-22T18:12:26+5:302023-08-22T18:12:41+5:30
चंद्रयान २ मध्ये जी चूक झाली ती चंद्रयान ३ मध्ये होणार नाही हे नक्की अशी माहिती इस्त्रोचे माजी प्रमुख डॉ. के सिवन यांनी दिली.
मुंबई – भारतासह अवघ्या जगाचे लक्ष चंद्रयान ३ कडे लागून राहिले आहे. चंद्रयान ३ चंद्रापासून २५ किमी अंतरावर असून आता लँडिंगसाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ मिनिटांनी चंद्रयान ३ चंद्रावर लँडिंग होईल. लँडर मॉड्युलपासून अवकाशापासून जमिनीपर्यंत संपर्काची तयारी झाली आहे. भारतासाठी हा क्षण गौरवाचा आणि अभिमानाचा आहे. सध्या चंद्रयान ३ च्या लँडिंगची तयारी सुरू आहे.
रशियाच्या लुना २५ चा अपघात आणि मागील चंद्रयान २ चे अपयश पाहता यंदा इस्त्रोने मोठी काळजी घेतली आहे. विक्रम लँडरच्या वरच्या आणि मागच्या बाजूस अँटिना जोडण्यात आलेत. त्यामुळे लँडिंग मॉड्युलचे प्रत्येक क्षणाचे आणि स्थितीचे अपडेट इस्त्रोला मिळतील. चंद्रयान ३ च्या लँडिंगच्या २ तासआधी आढावा घेतला जाईल. जर लँडिंगसाठी वातावारण पोषक नसेल तर लँडिग २७ ऑगस्टपर्यंत लांबणीवर जाऊ शकते अशी माहिती इस्त्रोच्या स्पेस एप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी दिली आहे.
तसेच चंद्राच्या पृष्ठभागावरील स्थिती पाहून चंद्रावर उतरायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. २३ ऑगस्टलाच आम्ही चंद्रावर उतरण्यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु जर काही विपरीत स्थिती असेल तर लँडिंग २७ ऑगस्टला केले जाईल. त्यासाठीही आम्ही काळजी घेतली आहे. यासाठी जे काही प्रक्रिया करायची ती आम्ही पूर्ण केली आहे असंही देसाई यांनी म्हटलं.
"Smooth Sailing" says ISRO as Chandrayaan-3 Vikram lander gets closer to the Moon
— ANI Digital (@ani_digital) August 22, 2023
Read @ANI Story | https://t.co/1Pw7D6vy9B#Chandrayaan3#MoonMission#ISROpic.twitter.com/zjZpwDzWkh
आधी झालेली चूक पुन्हा होणार नाही....
मागील चंद्रयान २ वेळी आम्ही चांगले काम केले होते. परंतु आम्हाला यश मिळाले नाही. फक्त लँडिंग प्रक्रियेत आम्ही पोहचलो नव्हतो. परंतु यावेळेस आम्ही चांगली तयारी केली आहे. सध्या आमच्यासाठी उत्सुकता आहे. आम्ही सगळेच सज्ज आहोत. यावेळी आम्हाला नक्की यश मिळणारच आहे. चंद्रयान २ मध्ये जी चूक झाली ती चंद्रयान ३ मध्ये होणार नाही हे नक्की अशी माहिती इस्त्रोचे माजी प्रमुख डॉ. के सिवन यांनी दिली.