Chandrayaan-3: अंतराळात जाणाऱ्या सर्व रॉकेटचा रंग पांढरा का असतो? असं आहे कारण  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 07:05 PM2023-08-22T19:05:07+5:302023-08-22T19:06:09+5:30

Chandrayaan-3:१९६० च्या दशकामध्ये अंतराळवीरांना चंद्रापर्यंत घेऊन जाणाऱ्या सॅटर्न व्ही पासून आजच्या काळातील फाल्कन ९ किंवा एरियन ५ पर्यंत बहुतांश रॉकेटचा रंग पांढरा असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र हा केवळ योगायोग नाही. याच्यामागेही विज्ञान आहे. 

Chandrayaan-3: Why are all rockets in space white? That is the reason | Chandrayaan-3: अंतराळात जाणाऱ्या सर्व रॉकेटचा रंग पांढरा का असतो? असं आहे कारण  

Chandrayaan-3: अंतराळात जाणाऱ्या सर्व रॉकेटचा रंग पांढरा का असतो? असं आहे कारण  

googlenewsNext

१९६० च्या दशकामध्ये अंतराळवीरांना चंद्रापर्यंत घेऊन जाणाऱ्या सॅटर्न व्ही पासून आजच्या काळातील फाल्कन ९ किंवा एरियन ५ पर्यंत बहुतांश रॉकेटचा रंग पांढरा असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र हा केवळ योगायोग नाही. याच्यामागेही विज्ञान आहे.

रॉकेट मुख्यत्वेकरून पांढऱ्या रंगाची असतात. जेणेकरून स्पेसक्राफ्ट गरम होत नाही. तसेच याच्यामध्ये क्रायोजेनिक प्रोपलेंट्स म्हणजे प्रणोदकांना लाँच पॅडवर आणि लाँचिंगदरम्यान सूर्याच्या रेडिएशनच्या संपर्कात आल्यामुळे गरम होण्यापासून वाचवलं जाऊ शकतं. 

बहुतांश स्पेसक्राफ्ट हे अशा प्रोपलेंट्सचा वापर करतात. जे बऱ्यापैकी थंड असतात. बहुतांश रॉकेटच्या पहिल्या टप्प्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या आरपी-१ इंधनाबरोबरच इतर सर्व लिक्वि़ड प्रोपलेंट्स क्रायोजेनिक पदार्थ असतात. त्यांना द्रवस्वरूपात कायम ठेवण्यासाठी शून्यापेक्षा कमी तापमानावर संग्रहित करणं आवश्यक असतं.

बहुतांश रॉकेटचा रंग पांढरा का असतो, त्याचं कारण पुढील प्रमाणे आहे. स्पेक्ट्रमटच्या सर्व रंगामध्ये पांढरा रंग हा सूर्याच्या प्रकाशाच्या उष्णतेला शोषून घेण्याऐवजी ती परावर्तित करण्यामध्ये सर्वात प्रभावी आहे. उष्णता असलेल्या दिवसांमध्ये गडद रंगाचं शर्ट घालून बाहेर फिरणारी कुठलीही व्यक्ती ही बाब लक्षात घेऊ शकते.

रॉकेट बनवणाऱ्या इंजिनियरना ही बाब माहिती आहे. त्यामुळे एका लॉन्च वाहनाला पांढऱ्या रंगामध्ये रंगवणं हे वाहनाच्या आतील टँकमध्ये क्रायोजेनिक प्रोपलेंट्सच्या ताममान वाढीला कमी करण्याचा एक स्वस्त मार्ग आहे, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच रॉकेट हे पांढऱ्या रंगामध्ये रंगवले जातात.  

Web Title: Chandrayaan-3: Why are all rockets in space white? That is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.