Chandrayaan-4 : चांद्रयान-4 देखील घडवणार इतिहास! चंद्रावर उतरण्यापूर्वीच घडणार चमत्कार, इस्रोचा मोठा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 08:55 AM2024-06-27T08:55:14+5:302024-06-27T08:59:04+5:30

Chandrayaan-4 : चांद्रयान-4 संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. इस्रो प्रमुखांनी यावर भाष्य केले आहे.

Chandrayaan-4 will also make history A miracle will happen before landing on the moon ISRO's big plan | Chandrayaan-4 : चांद्रयान-4 देखील घडवणार इतिहास! चंद्रावर उतरण्यापूर्वीच घडणार चमत्कार, इस्रोचा मोठा प्लॅन

Chandrayaan-4 : चांद्रयान-4 देखील घडवणार इतिहास! चंद्रावर उतरण्यापूर्वीच घडणार चमत्कार, इस्रोचा मोठा प्लॅन

Chandrayaan-4 ( Marathi News ) : इस्त्रोने गेल्या वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 उतरवून इतिहास रचला आहे. दक्षिण ध्रुवावर उतरणारी जगातील पहिली संस्था आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोने आता चांद्रयान-4 वर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. याबाबत इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी बुधवारी भाष्य केले. एस सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान-4 चे काही भाग एक नव्हे तर दोन प्रक्षेपणांमध्ये पाठवले जातील. हे भाग प्रथम कक्षेत पाठवले जातील आणि नंतर अवकाशात एकत्र केले जातील. याला जर यश आल्यास हे जगात पहिल्यांदाच होणार आहे. चंद्रावर पोहोचण्यापूर्वीच इस्रो इतिहास रचेल. चंद्रावरून नमुने आणणे हे चांद्रयान-4 चे मुख्य लक्ष्य असल्याचे एस सोमनाथ म्हणाले.

१ जुलैपासून मोठे ५ बदल होणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल, सविस्तर वाचा

इस्रोचे चांद्रयान-4 हे मिशन अतिशय गुंतागुंतीचे आणि महत्त्वाचे मिशन आहे. या मिशनची सर्वात खास गोष्ट म्हणजे लँडर इस्रोकडून तयार केले जात आहे आणि रोव्हर मॉड्यूल जपानकडून तयार केले जात आहे. हे अभियान इस्रो आणि जपानच्या JAXA द्वारे संयुक्तपणे राबवले जात आहे. 2026 पर्यंत चंद्रावर यान पाठवण्याची तयारी सुरू आहे. चांद्रयान-4 चे लँडिंग साईट शिवशक्ती पॉईंटवर असेल असे इस्रोने आधीच सांगितले आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे चांद्रयान-3 उतरले होते. कारण चांद्रयान-3 ने लँडिंग केल्यानंतर चंद्रावरील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचा शोध लावला.

दोन भाग पाठवणार

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान-4 एकाच वेळी प्रक्षेपित होणार नाही, तर त्याऐवजी अंतराळ यानाचे वेगवेगळे भाग दोन प्रक्षेपणांद्वारे कक्षेत पाठवले जातील. यानंतर चंद्रावर जाण्यापूर्वी हे वाहन अंतराळात जोडले जाईल. चांद्रयान-4 ची वहन क्षमता इस्रोच्या सध्याच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल.

इंटरनॅशनल स्पेस सेंटरमधील अनेक एजन्सींनी अंतराळयानाचे भाग एकत्र करण्याचे काम यापूर्वीच केले आहे. पण, ISRO आणि GEXA चा हा प्रयत्न जगात पहिल्यांदाच असेल. कारण याआधी कोणतेही अंतराळ यान स्वतंत्र भागांमध्ये सोडले नाही. या पराक्रमामुळे इस्रो चंद्रावर उतरण्यापूर्वीच इतिहास रचणार आहे.

चंद्रावरून नमुने पृथ्वीवर आणणे हे चांद्रयान-4 चे लक्ष्य आहे. याआधी चीनने नुकतीच अशी कामगिरी केली आहे. यासाठी इस्रो आणि जपानी एजन्सी GEXA एकत्र काम करत आहेत. दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले, "चंद्रावरून नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी आम्ही चांद्रयान-4 ची रचना केली आहे. आम्ही ते अनेक प्रक्षेपणांसह करण्याचा प्रस्ताव देत आहे, कारण आमची सध्याची रॉकेट क्षमता मजबूत नाही. एस सोमनाथ म्हणाले, म्हणून आम्हाला अंतराळात डॉकिंग क्षमतेची गरज आहे. 

Web Title: Chandrayaan-4 will also make history A miracle will happen before landing on the moon ISRO's big plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.