TATA ने चंद्रयान-3 मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली! जाणून घ्या त्यांनी कशी मदत केली?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 03:35 PM2023-07-20T15:35:41+5:302023-07-20T15:36:22+5:30

इस्त्रोचे चंद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.

chandrayaan3 tata steel made crane used in rocket launch manufactured in jamshedpur tata growth shop | TATA ने चंद्रयान-3 मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली! जाणून घ्या त्यांनी कशी मदत केली?

TATA ने चंद्रयान-3 मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली! जाणून घ्या त्यांनी कशी मदत केली?

googlenewsNext

चंद्रयान -3 शुक्रवारी १४ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. चंद्रयानाची जगभरात चर्चा झाली. चंद्रयान यशस्वी करण्यात फक्त इस्रोच नाही तर देशातील खासगी कंपन्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापैकी, देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक, टाटा समूहाची कंपनी, टाटा स्टील देखील एक आहे. चंद्रयान-3ला अवकाशात घेऊन जाणारे रॉकेट सोडण्यासाठी वापरण्यात येणारी क्रेन टाटाच्या कारखान्यात बनवण्यात आली.

टाटा स्टीलच्या वतीने चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन करताना असे म्हटले आहे की, आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रात टाटा स्टीलने तयार केलेल्या क्रेनने LVM3 M4 लाँच व्हेईकल असेंबल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. कंपनीने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात या सहकार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या क्रेनची निर्मिती टाटा स्टीलने जमशेदपूर येथील टाटा ग्रोथ शॉपमध्ये केली आहे.

अभिमानास्पद! वडील चालवतात पिठाची गिरणी, आई गृहिणी; लेक चंद्रयान-3 टीमचा भाग, म्हणतो...

१४ जुलै २०२३ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्रयान-3 लाँच केले. तिथे चंद्रयानचे इतर महत्त्वाचे घटक रांचीच्या हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनने तयार केले होते. त्याचबरोबर गोदरेज ग्रुपच्या गोदरेज एरोस्पेस या कंपनीनेही यामध्ये मोठे योगदान दिले आहे. टाटा स्टीलने जमशेदपूर कारखान्यात बनवलेली अत्याधुनिक क्रेन ज्याने हे मिशन यशस्वी करण्यात हातभार लावला ती म्हणजे इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग क्रेन. तयारीनंतर, प्रक्षेपण करण्यापूर्वी ते आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात स्थापित करण्यात आले.

टाटा समूहाची कंपनी टाटा स्टीलने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, चंद्रयान-3 लाँचिंगमधील योगदानाद्वारे आम्ही भारताच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीला आणि विकासाला चालना देण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. जमशेदपूरमध्ये टाटा स्टीलचा कारखाना स्वातंत्र्यापूर्वी सुरू झाला होता. पूर्वी ते टिस्को म्हणून ओळखले जात असे. भारतातील पहिला लोह आणि पोलाद कारखाना म्हणून १९०७ मध्ये त्याची स्थापना झाली. यानंतर जमशेदपूरला लोक टाटा नगर म्हणू लागले. मात्र, या कारखान्यात स्टील-लोखंडाचे उत्पादन १९१२ मध्ये सुरू झाले.

Web Title: chandrayaan3 tata steel made crane used in rocket launch manufactured in jamshedpur tata growth shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.