परिवर्तन पाणी संवर्धन मोहीम
By Admin | Published: March 13, 2016 12:05 AM2016-03-13T00:05:49+5:302016-03-13T00:05:49+5:30
जळगाव- पोदार स्कूलतर्फे पाणी संवर्धन व जलसंधारण यासंदर्भात रॅली काढण्यात आली. शनिवारी सकाळी बहिणाबाई उद्यानाजवळून ही रॅली निघाली. त्यात विद्यार्थी सहभागी झाले. पर्यावरण, जलसंधारणासंबंधी संदेश देणारे फलक त्यांच्या हातात होते.
ज गाव- पोदार स्कूलतर्फे पाणी संवर्धन व जलसंधारण यासंदर्भात रॅली काढण्यात आली. शनिवारी सकाळी बहिणाबाई उद्यानाजवळून ही रॅली निघाली. त्यात विद्यार्थी सहभागी झाले. पर्यावरण, जलसंधारणासंबंधी संदेश देणारे फलक त्यांच्या हातात होते. १५० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखविली. या वेळी मुख्याध्यापक योगेंद्र सिंग व इतर शिक्षक उपस्थित होते. रॅली बहिणाबाई उद्यानापासून निघाली. तीचा समारोप शिवतीर्थ मैदानावर झाला. विद्यार्थ्यांनी पाणी बचत, संवर्धनाच्या विविध घोषणा दिल्या. युवा, नव्या पिढीमध्येमध्ये पाणी बचतीचे संस्कार रूजायला हवेत, असे आवाहन योगेंद्र सिंग यांनी केले.