जीएसटीआर भरण्याच्या पद्धतीत झाला बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 02:37 AM2020-09-07T02:37:07+5:302020-09-07T02:37:12+5:30
अर्जुना, सप्टेंबर २०२० पासूनचे जीएसटीआर ३-बी जीएसटीएनवर दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे
अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-३ बीच्या इनवर्ड आणि आउटवर्ड बाजूच्या डेटा प्रक्रियेत कोणते बदल झाले आहे?
कृष्ण : अर्जुना, सप्टेंबर २०२० पासूनचे जीएसटीआर ३-बी जीएसटीएनवर दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. इनवर्ड बाजूस जीएसटीआर २ बी रिकन्साइल करून ते जीएसटीआर ३ बी व जीएसटीआर २-ए मधील आयटीसी सोबत जुळवावे लागेल. आउटवर्ड बाजूस जीएसटीआर-१ची आकडेवारी जीएसटीआर ३ बीमध्ये दिसेल. त्यामुळे कर दायित्वाची जुळवणी शक्य होईल. यामुळे जीएसटीआर ३बी अधिक बरोबर दाखल होईल. याकडे करदात्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
अर्जुन : कृष्णा, आयटीसीचे जीएसटीआर २बी मध्ये, जीएसटीआर २-ए पेक्षा काय वेगळे आहे?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर २ बी म्हणजे पुरवठादारांकडून जीएसटीआर १, ५ किंवा ६ मध्ये सादर केलेल्या माहितीच्या आधारावर प्रत्येक करदात्यासाठी असलेले इनपुट टॅक्स क्रेडिटचे आॅटो ड्राफ्टेड स्टेटमेंट आहे. हा आयटीसीचा सारांश महिन्याच्या १२ तारखेपर्यंत उपलब्ध असेल. जीएसटीआर-२ ए हा कर परतावा आहे. ज्यामध्ये महिनाभरात विविध खरेदीदारांकडून खरेदी केलेल्याची यादी येते. जीएसटीआर २-ए हे दररोजच्या माहितीच्या आधारावर बदलत असेल. मात्र, जीएसटीआर २ बी हे पुरवठादारांच्या क्रियांच्या आधारावर बदलणार नाही.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर २बी कसे तयार होईल?
कृष्ण : अर्जुना, यात पुरवठादारांनी चालू महिन्याच्या ११ तारखेपर्यंत दाखल केलेल्या जीएसटीआर १ मधील सर्व माहिती, कागदपत्रांचा समावेश पुढील महिन्यातील जीएसटीआर २ बीमध्ये होईल. पुरवठादारांनी दाखल केलेल्या जीएसटीआर २ मधील माहिती करदात्याच्या पुढील ओपन जीएसटीआर २बीमध्ये येईल. पुरवठादारांनी दाखल केलेल्या तारखेचा विचार केला जाणार नाही. उदाहरणार्थ, पुरवठादारांनी जर त्यांच्या जुलैच्या रिटर्नमध्ये आयएनव्ही-१ दि. १५ जुलै २०चे बिल दाखल केल्यास ते जीएसटीआर-२ बी मध्ये दिसेल. (१२ आॅगस्ट रोजी काढलेले जीएसटीआर २ बी)
अर्जुन : कृष्णा, नवीन जीएसटीआर २-बी ची वैशिष्ट्ये काय आहेत?
कृष्ण : अर्जुना, या फॉर्ममध्ये आयसीईजीएटीईमध्ये असलेली आयातीची माहिती १२ सप्टेंबर २०२० नंतर उपलब्ध केली जाईल. आयातीवरील रिव्हर्स चार्ज क्रेडिट सिस्टिमचा भाग नाही. ते करदात्यास जीएसटीआर ३बीच्या टेबल ४ (ए) (२)मध्ये नमूद करावा लागेल. जीएसटीआर ३ बी दाखल करताना करदात्यांनी सुनिश्चित केले पाहिजे की, क्रेडिट दोनदा घेतले गेले नाही. तर, कायद्यानुसार क्रेडिट रिव्हर्स केले आणि आरसीएम आधारावर कर भरला आहे. या मध्ये करदात्यांना मोठा फायदा आहे. त्यांचे क्रेडिट कायद्यानुसार होईल आणि दाखल करण्यापूर्वी जीएसटीआर ३ बी रिकन्साइल होईल.
अर्जुन : कृष्णा, आउटवर्ड बाजूस जीएसटीआर ३ बी आणि जीएसटीआर १ जुळवण्याच्या पद्धतीत काय बदल करण्यात आले आहेत?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर १ करदात्यांनी दाखल केले असल्यास, त्यातील माहिती जीएसटीआर ३-बी मध्ये दिसेल. त्यामुळे आउटवर्ड बाजूचे रिकन्सिलेशन होऊन जाईल. जीएसटीआर ३-बी आणि जीएसटीआर १ मधील चुका कमी होऊन ते रिकन्साइल होईल. दीर्घकाळासाठी हे करदात्यांना उपयुक्त ठरेल.
जीएसटीआर दाखल करतानाची काळजी
अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, आता करदात्यांनी क्रेडिट घेताना आणि जीएसटीआर-१ दाखल करताना काळजी घेतली पाहिजे. जीएसटीआर ३ बी दाखल करताना करदात्यांना मदत होणार आहे. आयटीसीच्या जीएसटीआर २ बी आणि जीएसटीआर १ शी रिकन्साईल असेल. एकूणच जीएसटीआर ३ बी दाखल करणे सोपे झाले आहे. त्यामुळे कमीत कमी चुका होतील. हा बदल जेव्हा इनव्हॉईसिंगसाठी लागू होईल, तेव्हा अजून सोपे जाईल.